
आयएमएतर्फे न्यायवैद्यकीय परिषद
पुणे, ता. ४ : ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या (आयएमए) पुणे शाखेतर्फे राज्यस्तरीय न्यायवैद्यकीय परिषदचे रविवारी (ता. ६) आयोजन केले आहे. टिळक रस्त्यावरील ‘डॉ. नितू मांडके आयएमए हाऊस’ येथे येथे सकाळी नऊ वाजल्यापासून ही परिषद सुरू होईल, अशी माहिती पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. बी. एल. देशमुख आणि सचिव डॉ. सुनील इंगळे यांनी दिली.
‘एमएमए’च्या राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. सुहास पिंगळे, चिटणीस डॉ. मंगेश पाटे आणि ग्राहक विवाद निवारण आयोगाचे अध्यक्ष डॉ. संतोष काकडे यांच्या प्रमुख उपस्थित ही परिषद होईल. महाराष्ट्र वैद्यक परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे व राष्ट्रीय न्यायवैद्यकीय विभागाचे सहअध्यक्ष (कोचेअरमन मेडिकोलीगल) डॉ. दिनेश ठाकरे उपस्थित राहणार आहेत. तसेच पुण्याचे डॉ. जयंत नवरंगे, डॉ. संजय पाटील सहभागी होणार आहेत. या परिषदेत वैद्यकीय व्यवसाय करताना या बाबतीत येणाऱ्या अडचणीबाबत तज्ज्ञ डॉक्टर व वकील मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेला महाराष्ट्र वैद्यक परिषदेतर्फे दोन ‘क्रेडिट पॉइंट दिले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..