वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्यास २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) मार्फत राबविण्यात येणाऱ्या काही विषयांतील प्रवेश प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहेत. एल. एल. बी., बी. एड. यांसारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सुरू असलेली फेरी फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे. त्याअनुषंगाने व्यावसायिक अभ्यासक्रम शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वसतिगृह प्रवेश किंवा स्वाधार योजना यातील लाभापासून एकही पात्र विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी ही मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
वसतिगृहातील प्रवेश व स्वाधार योजना या दोन्हींसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिल्याचे परिपत्रक जारी केले आहे. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातील ९३ सरकारी वसतिगृहात मागासवर्गीय विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाणार आहे, तरी व्यावसायिक अभ्यासक्रम शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या जिल्ह्यातील संबंधित मागासवर्गीय मुला-मुलींच्या सरकारी वसतिगृहातून अर्ज प्राप्त करून परिपूर्ण कागदपत्रांसह २८ फेब्रुवारीपर्यंत वसतिगृहात सादर करावेत. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज वितरण आणि स्वीकृती संबंधित जिल्ह्यातील सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात करण्यात येत आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top