‘दहावीच्या परीक्षेसाठी १४ मार्चपर्यंत अर्ज करता येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘दहावीच्या परीक्षेसाठी 
१४ मार्चपर्यंत अर्ज करता येणार
‘दहावीच्या परीक्षेसाठी १४ मार्चपर्यंत अर्ज करता येणार

‘दहावीच्या परीक्षेसाठी १४ मार्चपर्यंत अर्ज करता येणार

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान आयोजित केली आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १४ मार्च सकाळी अकरा वाजेपर्यंत नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज करता येतील, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाने प्रकटनाद्वारे दिली आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क आकारण्यात येऊ नये, विलंब शुल्क माफ करण्यात यावे. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे राज्य सरकारने सांगितले आहे. त्यानुसार सर्व संबंधित घटकांना विभागीय मंडळामार्फत त्या पद्धतीने कार्यवाही केली आहे. तसेच दहावीच्या परीक्षा १५ मार्चपासून सुरू होत असल्याने या परीक्षेसाठी १४ मार्चपर्यंत नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर मात्र अर्ज भरण्याची सुविधा संकेतस्थळावरून बंद करण्यात येईल. तसेच दहावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी म्हणून नाव नोंदणीसाठी अर्ज केलेल्या, परंतु, प्रस्तावामुळे त्रुटी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी १० मार्चपर्यंत त्रुटींची पुर्तता करून १२ मार्चपर्यंत नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे आणि दिलेल्या मुदतीत परीक्षेचा अर्ज भरावा, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top