‘भारताने चीनच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणे बंद करावे’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘भारताने चीनच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणे बंद करावे’
‘भारताने चीनच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणे बंद करावे’

‘भारताने चीनच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणे बंद करावे’

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : ‘‘चीनमधील प्रगतीचा आलेख जरी वाढत असला, तरी तेथील लोकशाही धोक्यात येत आहे. भारताने चीनशी संबंध प्रस्थापित केल्याने त्यांची मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. मात्र, सीमावादावर चीन माघार घ्यायला तयार नसेल, तर भारतानेही त्यांच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणे बंद करणे आवश्यक आहे,’’ असे मत चीनमधील माजी भारतीय राजदूत गौतम बंबावाले यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग, सेंटर फॉर चायना ॲनॅलिसिस अँड स्ट्रॅटेजी, सेंटर फॉर ॲडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चीनचा उदय आणि जागतिक राजकारणावरील परिणाम’ विषयावर दोन दिवसीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद्‌घाटन विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील सभागृहात झाले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, पीटर रिमेले, डॉ. विजय खरे आदी मान्यवर उपस्थित होते.

बंबावाले म्हणाले, ‘‘चीनमध्ये सतत एकाच पक्षाकडे असणारी सत्ता, या सत्तेला देशांतर्गत धोका निर्माण होऊ नये म्हणून घेतलेले आर्थिक प्रगतीला मारक निर्णय, यामुळे अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. सुरक्षेच्या नावाखाली होणारी दडपशाही आणि माध्यमे आणि समाजमाध्यमांवर असणारा वचक या सर्व गोष्टींचा ट्रेंड आला आहे. ज्यामुळे प्रगतीचा आलेख जरी वाढत असला, तरी तेथील लोकशाही धोक्यात येत आहे. चीनने मागील चाळीस वर्षांत चांगली प्रगती केली आहे, मात्र ही प्रगती तेथील एकधिकारशाहीतून आलेली असून ती चिनी जनतेसाठी योग्य नाही.’’

डॉ. करमळकर म्हणाले, ‘‘चीनने मागील काही वर्षात शिक्षणात मोठी प्रगती केलेली दिसत आहे. त्यांनी विज्ञान तंत्रज्ञान, स्टार्टअप यावर भर दिला आहे. आपल्या देशही शिक्षणाच्या दृष्टीने त्याच दिशेने जात आहेत. औद्योगीकरण आणि शिक्षणाची सांगड घालणे महत्त्वाचे वाटतो.’’

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top