
आजीवन अध्ययन, मानसशास्त्र विभागाच्या इमारतीचे उद्घाटन
पुणे, ता. २४ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आजीवन अध्ययन व शिक्षणविस्तार आणि मानसशास्त्र विभागाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आंतरशाखीय अभ्यासाचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, आजीवन अध्ययन व शिक्षण विस्तार विभागाचे प्रमुख डॉ. धनंजय लोखंडे, मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विश्वनाथ शिंदे तसेच अनेक माजी विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.
डॉ. करमळकर म्हणाले,‘‘या विभागांकडून आजवर अतिशय उत्तम काम झाले आहे. भविष्यात काळासोबत नव्याने जाण्यासाठी आंतरशाखीय पद्धतीने आपण आणखी विस्तार कसा करू शकतो आणि कोणते नवे अभ्यासक्रम आणता येतील, याबाबत पुढील काळात निर्णय घेण्यात येईल.’’ विद्यापीठाने कोणतेही नवीन बांधकाम हाती न घेता आधी जे हाती घेतलेले प्रकल्प होते ते पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. विद्यापीठात हे दोन्हीही विभाग गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. या विभागातील कामाचे व्यापक स्वरूप लक्षात घेत यांना नवीन इमारतीत स्थान देण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..