लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी प्रताप परदेशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी प्रताप परदेशी
लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी प्रताप परदेशी

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी प्रताप परदेशी

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी २०२२-२३ या मंदिराच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षासाठी अ‍ॅड. प्रताप परदेशी यांची निवड झाली. कार्यकारी विश्वस्तपदी अ‍ॅड. शिवराज कदम जहागीरदार तर, खजिनदारपदी महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड. रजनी उकरंडे आणि उप उत्सवप्रमुख म्हणून युवराज गाडवे यांची नियुक्ती झाली आहे. यासोबतच सुनील रुकारी, डॉ. पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई हे विश्वस्तपदी असणार आहेत.
ट्रस्टचे नवनियुक्त अध्यक्ष अ‍ॅड. परदेशी हे ज्येष्ठ विधीज्ञ असून, पुणे बार असोसिएशनवर त्यांनी काम केले आहे. श्री महालक्ष्मी मंदिरावरही ते विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. अ‍ॅड. जहागीरदार हे विधीज्ञ असून मागील दत्तमंदिर ट्रस्टच्या पंचवार्षिक कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. पुणे बार असोसिएशनसह पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन व विविध धार्मिक, सामाजिक संस्थांवर ते कार्यरत आहेत. तसेच, महेंद्र पिसाळ हे ‘सकाळ माध्यम समूहा’त गेल्या २० वर्षांपासून मुख्य कार्यपालन अधिकारी पदावर कार्यरत आहेत. यंदा वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रमांसोबतच शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम होणार आहेत. न्यासाकडे असलेल्या निधीचा विनियोग सामाजिक कार्यासाठी करणार असल्याचा निर्धार अ‍ॅड. परदेशी यांच्यासह नवनियुक्त विश्वस्त मंडळाने केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top