‘भोंग्याच्या नियमावलीला राज्य सरकारकडून विलंब’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘भोंग्याच्या नियमावलीला राज्य सरकारकडून विलंब’
‘भोंग्याच्या नियमावलीला राज्य सरकारकडून विलंब’

‘भोंग्याच्या नियमावलीला राज्य सरकारकडून विलंब’

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मशिदींवरील भोंग्याबाबत भूमिका मांडली. त्याबाबत नियमावली ठरविण्यासाठी राज्य सरकारला ३ मेची मुदत दिली; पण राज्य सरकार नियमावलीच्या बाबतीत चालढकल करीत आहे. राज्यांत धार्मिक व सामाजिक तेढ निर्माण करण्याची राज्य सरकारची रणनीती असल्याचा आरोप मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी केला. भोंग्याविषयी मागील तीन आठवड्यापासून राज्य सरकारमधील नेते मंडळी आगपाखड करीत आहे. २००५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मनसेने भूमिका घेऊन, त्याबाबत राज्य सरकारला कारवाई करण्याविषयी सूचना केल्या आहेत, असे असतानाही राज्य सरकार नियमावलीविषयी मुद्दाम विलंब करीत आहे, त्याचा निषेध संभूस यांनी केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top