राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार नाही
राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार नाही

राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार नाही

sakal_logo
By

पुणे,ता. २४ : ‘‘राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार नाही. भाजप हा संघर्ष करणारा पक्ष आहे. त्यामुळे जशास तसे उत्तर देऊ,’ अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी शिवसेनेला आव्हान दिले.
''सकाळ''च्या वतीने आयोजित महाबँड कार्यक्रमासाठी फडणवीस पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी आलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यावर फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘‘कालची गोष्ट ही मुंबई पोलिसांच्या इतिहासातील सर्वात लाजीरवाणी गोष्ट आहे. पोलिस स्टेशनजवळ हल्ला होतो. याचा अर्थ या हल्ल्याला पोलिसांचे समर्थन आहे. पोलिस नाकाम झाली आहे की त्यांना हा हल्ला रोखता आला नाही, असा प्रश्‍न उपस्थित होतो. झेड सुरक्षा असलेल्या लोकांबद्दल हे वागणे म्हणजे ‘क्रॉस मिस कंडक्ट’ आहे. त्यामुळे पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे.’’

राष्ट्रपती राजवटीबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘‘राष्ट्रपती राजवटीची मागणी आम्ही करणार नाही. परंतु प्रवीण दरेकर आणि चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील परिस्थिती पाहिली की सामान्य लोकांना राज्यात राष्ट्रपती राजवट लागावी, असे वाटते आहे. महाराष्ट्रात असे झुंडशाहीचे राजकारण कधी पाहिले नव्हते. आम्ही घाबरत नाही. पण हे सरकार एका महिलेला घाबरत आहे. हनुमान चालिसा महाराष्ट्रात नाही म्हणणार, तर काय पाकिस्तानमध्ये म्हणणार. हे सगळ्यात वाईट पर्व आहे. जे प्रकरण नाही, ते मोठ केले. सहानभूती मिळावी म्हणून हे सगळ केले जात आहे. एका महिलेला रात्री तुरुंगात टाकता, लाज वाटली पाहिजे.’’

‘शरद पवार यांनी आत्मपरीक्षण करावे’
राज्यात आमची सत्ता असताना आम्ही देशातील ४७ टक्के गुंतवणूक राज्यात आणली, असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले,‘‘तुम्ही जर घोटाळे करणार असाल, तर कोण तुमच्याकडे येईल. आम्ही देशाच्या ४७ टक्के गुंतवणूक राज्यात आणली. शरद पवार यांनी आत्मचिंतन करावे की महाराष्ट्रात कोणी का येत नाही. राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडली आहे. भारनियमन सुरू आहे, राज्यातले दोन मंत्री तुरुंगामध्ये आहेत. या अवस्थेमध्ये कोण तुमच्याकडे येईल.’’

59546

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top