
उन्हाचा कडाका वाढण्याची चिन्हे
पुणे, ता. २५ ः पुणे शहर आणि परिसरात सोमवारी काही ठिकाणी रिमझीम पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा पसरला होता. या वातावरणामुळे उकाड्यापासून थोडी सुटका झाली. मात्र, शहरात आकाश पुन्हा निरभ्र होत उन्हाचा कडाका वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आता पुणेकरांना उन्हाचा चटका पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. सोमवारी सकाळी उन्हाचे सावट कायम होते मात्र दुपारनंतर पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले. तसेच काही मुख्य शहरासह उपनरातील काही भागांमध्ये वारे देखील वाहत होते, आणि बघता बघता तुरळक भागात पाऊस पडला. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. सोमवारी शहरात ३९.१ अंश सेल्सिअस कमाल आणि २१.७ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे व परिसरात पुढील आठवडाभर आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. मात्र एखाद-दुसऱ्या दिवशी अंशतः ढगाळ वातावरणाची ही शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या घरात पोचू शकतो. परिणामी नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..