ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकीचालकांवर कारवाई एका दिवसात ३३७ जणांकडून तीन लाखांचा दंड वसूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रिपल सीट जाणाऱ्या 
दुचाकीचालकांवर कारवाई
एका दिवसात ३३७ जणांकडून तीन लाखांचा दंड वसूल
कोरोनामुळे पुन्हा रेशीमगाठी जुळविण्यासाठी प्रयत्न

ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकीचालकांवर कारवाई एका दिवसात ३३७ जणांकडून तीन लाखांचा दंड वसूल

sakal_logo
By

पिंपरी, ता. १३ : दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाच्या पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. ११ एप्रिलला सोमवारी एका दिवसांत एकूण ३७७ जणांवर विशेष दंडात्मक कारवाई केली आहे. यातून पोलिसांनी एका दिवसांत ३ लाख ८३ हजार ५०० रुपये इतका दंड वसूल केला आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, दुसऱ्याला इजा पोचविणे, निष्काळजीपणे वाहन चालविणे, वाहन चालवत मोबाईलवर बोलणे, त्याचबरोबर ट्रिपल सीट वाहन चालविणे असे बेशिस्तीचे वाहतूक दर्शन सध्या शहरात जोमात सुरु आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये रॅश वाहन चालविणाऱ्या एकूण ९ जणांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. सध्या वाहनांच्या सायलन्सरमध्ये फटाक्यांसारखे आवाज काढण्याचा ट्रेंड तरुणांनी सुरु केला आहे. महामार्गालगत असे बेशिस्त तरुण सध्या अनेक ठिकाणी नजरेस पडत आहेत.
---
यापुढे कोणीही ट्रिपल सीट आढळल्यास १८४ नुसार कारवाई केली जाईल. रॅश ड्रायव्हिंग करताना तरुण मुले आढळून येत आहेत. नागरिकांना याचा त्रास होत आहे. शिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघन वारंवार केले जात आहे.
- आनंद भोईटे, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग
--
ट्रिपल सीट वाहन चालविणारे वाहनचालक व वसूल झालेला दंड

विभाग कारवाई केलेले दंड हजार रुपयांमध्ये
सांगवी ५० ५००००
वाकड २१ २७५००
हिंजवडी २२ २२०००
निगडी १८ १८०००
पिंपरी ८ ८०००
भोसरी २८ २८०००
चिंचवड १५ १५०००
चाकण ६३ ६३०००
महाळुंगे १७ १७०००
दिघीआळंदी ६० ६००००
देहूरोड ०८ ८०००
तळेगाव १४ १४०००
तळवडे ५३ ५३००००

एकूण दंड ३ ,८३, ५००

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..