पोल्ट्री शेडमध्ये बनावट मद्याचा कारखाना; दोघांना कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोल्ट्री शेडमध्ये बनावट मद्याचा कारखाना; दोघांना कोठडी
पोल्ट्री शेडमध्ये बनावट मद्याचा कारखाना; दोघांना कोठडी

पोल्ट्री शेडमध्ये बनावट मद्याचा कारखाना; दोघांना कोठडी

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : पोल्ट्री उद्योगाच्या नावाखाली दौंड तालुक्यात बनावट मद्याचा कारखाना चालविणाऱ्या दोघांना राज्य उत्पादन शुल्काच्या पुणे विभागाने अटक केली. दोघा संशयितांकडून सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे.

कैलास सुदाम घुंगुर्डे (वय २४, रा. कानगाव, दौंड) व मोहन जगन्नाथ सूळ (वय ३३, रा. पाटस, दौंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. राज्य उत्पादन शुल्काच्या पुणे विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील कानगाव हद्दीत घोगरे वस्तीलगत बनावट देशी दारूची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून उत्पादन शुल्काच्या ‘जी’ विभागाने २१ मार्चच्या मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. त्यावेळी एका वाहनातून बनावट देशी दारूच्या १४४ बाटल्या आढळून आल्या.

तपासादरम्यान, आरोपींनी बनावट दारू दौंड तालुक्यातील लाळगेवाडी येथे कुक्कुटपालन पोल्ट्री शेडमधून आणल्याचे सांगितले. त्या पोल्ट्री शेडची तपासणी केली असता, त्याठिकाणी देशी आणि विदेशी दारू तयार करण्याचे रसायन, दोन सीलिंग मशिन असा सुमारे दोन लाख ८८ हजारांचा मुद्देमाल आढळून आला होता.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..