Fatty Liver
Fatty LiverSakal

नवी डोकेदुखी ‘फॅटी लिव्हर’!

फक्त मद्यपान केल्यानेच यकृताचे गंभीर आजार निर्माण होत नाही, तर त्यामागे खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी हादेखील सर्वांत महत्त्वाचा भाग आता ठरत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले.
Summary

फक्त मद्यपान केल्यानेच यकृताचे गंभीर आजार निर्माण होत नाही, तर त्यामागे खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी हादेखील सर्वांत महत्त्वाचा भाग आता ठरत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले.

पुणे - फक्त मद्यपान (Drink) केल्यानेच यकृताचे (Liver) गंभीर आजार (Sickness) निर्माण होत नाही, तर त्यामागे खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी हादेखील सर्वांत महत्त्वाचा भाग आता ठरत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले. दर वर्षी १९ एप्रिल हा जागतिक यकृत दिन (Liver Day) म्हणून पाळला जातो. यकृताच्या विविध आजाराबद्दल जनजागृती करणे, हा या दिनाचा उद्देश आहे. त्या पार्श्वभूमिवर वैद्यकीय तज्ज्ञांनी काही सल्ले दिले आहेत.

यकृताचे महत्त्व

काही आपल्या पोटात जाते, त्याचे शुद्धीकरण यकृतामध्ये होते. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे फॅटी लिव्हरसारखी समस्या उद्भवल्यास यकृताच्या कार्यावर त्याचा परिणाम होतो. त्यातून शुद्धीकरणावर परिणाम होतो. त्यामुळे शरीरातील उत्सर्जित अनावश्यक घटक उत्सर्जित होत नाहीत. त्याचा थेट परिणाम इतर अवयवांच्या कार्यक्षमतेवर होतो. त्यातून विविध आजार उद्भवण्याचा धोका असतो.

फॅटी लिव्हर म्हणजे काय ?

  • यकृत पेशींमध्ये जास्त प्रमाणात चरबी साठल्यास फॅटी लिव्हर हा विकार उद्भवतो.

  • ५ टक्क्यांपेक्षा जास्त चरबी असल्यास यकृत फॅटी मानले जाते.

  • अनेक वेळा मद्यपान न करताही ‘फॅटी लिव्हर’चा आजार होतो. त्याला ‘नॉन अल्कोहोल लिव्हर डिसीज’ (एनएएफएल) म्हणतात.

  • ‘एनएएफएलडी’ हा हृदयरोग, मधुमेह आणि मूत्रपिंडाच्या रोगासारख्या आजारांच्या अतिरिक्त जोखमीची शक्यता वाढवतो.

कारणे काय?

  • व्यायामाचा अभाव

  • जीवनशैलीमधील अनियमितता. यामध्ये वेळी - अवेळी खाणे, भुकेची वेळ नसताना खाणे, अयोग्य आहार घेणे, पचायला जड पदार्थ रात्री खाणे, दिवसा झोपणे - रात्री जागरण करणे.

  • पोटाची अतिरिक्त चरबी, पोटाचा घेर अधिक असणे

  • साखरयुक्त पेय आणि जंकफूडचा आहारात वापर

फॅटी लिव्हरचे बरेच जण हे काहीही लक्षणे दिसत नसल्याने बिनधास्त असतात. पण तरीही तुम्हाला बाकी काही त्रास असतील किंवा तुमच्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये फॅटी लिव्हर असे निदान आलेले असल्यास त्याकडे दुर्लक्षित करू नका. योग्य वेळी योग्य तो उपचार केल्यास ‘फॅटी लिव्हर’ हा आजार बरा होऊ शकतो.

- प्रा. डॉ. सुरेश पाटणकर, संचालक, एस हॉस्पिटल

लक्षणे

- बहुतांशी लोकांमध्ये फॅटी लिव्हरची कोणतीही लक्षणे दिसत नाही. काही कारणास्तव सोनोग्राफी केली असता ''फॅटी लिव्हर’चे निदान होते.

- मधुमेह, मूत्रपिंड विकार असे दिसून येतात.

- उत्साह न वाटणे, भूक मंदावणे, अॅसिडीटी, पोट साफ न होणे

निदान

  • सर्वसामान्यपणे सोनोग्राफी केल्यास याचे निदान होऊ शकते. याबरोबरच फायब्रोस्कॅन, एमआरआय, या तपासण्याच्या मदतीने देखील माहिती मिळू शकते.

फॅटी लिव्हर या विषयावर संशोधन प्रकल्प चालू आहेत. त्यात शास्त्राधारित क्लिनिकल ट्रायल केल्या आहेत, त्या मध्ये योग्य तो आहार, जीवनशैलीतील बदल व संशोधित औषधांचा वापर करून हा आजार बरा होऊ शकतो, असे सिद्ध झाले आहे.

- डॉ. सागर पाटणकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com