PMP Bus
PMP BusSakal

‘पीएमपी’ची पाससेवा आजपासून होणार बंद

‘पीएमपी’च्या लांब पल्ल्याच्या मार्गावरील दैनंदिन पास सुविधा एक एप्रिलपासून बंद केली जाणार आहे.
Summary

‘पीएमपी’च्या लांब पल्ल्याच्या मार्गावरील दैनंदिन पास सुविधा एक एप्रिलपासून बंद केली जाणार आहे.

पुणे - ‘पीएमपी’च्या (PMP) लांब पल्ल्याच्या मार्गावरील दैनंदिन पास (Pass) सुविधा (Facility) एक एप्रिलपासून बंद (Close) केली जाणार आहे. यामध्ये एक हजार ४०० रुपयांचा मासिक पास आणि एका दिवसाचा ७० रुपयांचा पासचा समावेश आहे. ही पाससेवा एकूण ७८ मार्गावर बंद केली जाणार आहे.

हे सर्व मार्ग एसटी बससेवेच्या मार्गावरील आहेत. या मार्गावरील तिकीट दर हे एसटीपेक्षा ५ ते १० रुपयांनी कमी आहेत. यात बदल करण्यात येणार असून, येत्या काही दिवसांत एसटीप्रमाणेच तिकिटाचे दर आकारले जाणार आहेत. तसेच, एसटी सेवा सुरळीत झाल्यानंतर काही मार्ग बंद केले जातील, असे पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

डिझेल बस होणार हद्दपार

पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी पीएमपीच्या ताफ्यात सीएनजी आणि इलेक्ट्रीक बस वाढविण्यात येत आहेत. ताफ्यातील २०० पैकी आता ४० डिझेल बस राहिल्या आहेत. त्या टप्प्याटप्प्याने हद्दपार केल्या जाणार आहेत. यानंतर पुण्यात डिझेल बस धावणे बंद होणार आहे, असे मिश्रा यांनी सांगितले.

बाणेर डेपो पूर्ण क्षमतेने सुरू होणार

बाणेर डेपोतील १४० ई-बसचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतरही ‘पॉवरविना ११० ई-बस डेपोतच’ हे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. त्याबाबत माहिती देताना मिश्रा म्हणाले, ‘येत्या महिनाभरात पूर्ण क्षमतेने वीज मिळणार असून, सर्व बस मार्गावर धावतील. सध्या ७० बस मार्गावर धावत आहेत.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com