‘सुखोई’चा टायर फुटल्याने वाहतूक विस्कळित विमानांचे वेळापत्रक कोलमडले; प्रवाशांना मनस्ताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सुखोई’चा टायर फुटल्याने वाहतूक विस्कळित
 
विमानांचे वेळापत्रक कोलमडले; प्रवाशांना मनस्ताप
‘सुखोई’चा टायर फुटल्याने वाहतूक विस्कळित विमानांचे वेळापत्रक कोलमडले; प्रवाशांना मनस्ताप

‘सुखोई’चा टायर फुटल्याने वाहतूक विस्कळित विमानांचे वेळापत्रक कोलमडले; प्रवाशांना मनस्ताप

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीवर हवाई दलाचे सुखोई एमकेआय ३० विमान दुपारी ३ वाजता उतरत असताना त्याचा टायर अचानक फुटला. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही; मात्र विमान वाहतूक तीन तास विस्कळित झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. दुपारी ३.३० नंतर वाहतूक सुरळीत झाली. यामध्ये सुमारे ३० पेक्षा जास्त विमानांच्या फेऱ्यांना उशीर झाला.

लोहगाव विमानतळावर हवाई दलाचा दररोज दोन तास उड्डाणांचा सराव असतो. त्यामध्ये सुखोई विमान दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असताना अचानक टायर फुटले. या घटनेनंतर अन्य विमानांची उड्डाणे तात्काळ थांबवण्यात आली. दुपारी ३.१५ वाजता धावपट्टी खुली करण्यात आली, असे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले. या घटनेमुळे पुण्यात उतरणाऱ्या पाच विमानांचा मार्ग बदलण्यात आला; तर तीन विमानांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. विमान वाहतूक विस्कळित झाल्यामुळे विमानतळावरील हजारो प्रवाशांमध्ये गोंधळ उडून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

विमानतळावरील सर्व लाऊंज, उपाहारगृहे फुल्ल झाली होती. विमान कंपन्यांचे प्रतिनिधी प्रवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते, परंतु प्रवासी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या घटनेचे पडसाद ट्विटर, फेसबुक आदी सोशल मीडियावरही उमटले. याबाबत विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांच्याशी संपर्क साधला असता, विमान वाहतूक दुपारी ३.३० नंतर सुरळीत झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यानच्या काळात ३० हून अधिक विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला.

सुखोई एमकेआय ३० या विमानाचा टायर फुटल्याने विमानतळावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अचानक ही घटना घडल्याने विमानतळ प्रशासनाचे कर्मचारी हतबल ठरले, असे ट्विट सोपान खेडेकर यांनी केले.

सुखोई एमकेआय ३० या विमानाचा टायर फुटल्याने पुणे विमानतळावरून बेळगावला जाणारे विमान रद्द झाले, अशी माहिती देणारे ट्विट डॉ. शोयब या व्यक्तीने केले आहे.

सरावादरम्यान पुणे विमानतळावर उतरताना सुखोई एमकेआय ३० विमानाचा टायर फुटला. या घटनेत जीवितहानी झाली नाही. हवाई दलाच्या कर्मचाऱ्‍यांनी वेगाने धावपट्टीवर धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. याबाबत अधिक तपशील गोळा केला जात आहे, अशी माहिती हवाई दलाकडून देण्यात आली.

विमानतळावरून...
दिल्ली, बंगळूर, कोलकाता, जयपूर, प्रयागराज, नागपूर, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद, चंडीगड, लखनौ आदी २८ शहरांसाठी सुमारे ६० विमानांची उड्डाणे होतात.
दररोज सुमारे १८ हजार प्रवाशांची वाहतूक होते.

NE22S53286

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..