Vikram Kumar
Vikram KumarSakal

मानसिकता बदला, अन्यथा कारवाई; ‘फ्लेक्स’बाबत आयुक्तांचा इशारा

शहराच्या विद्रूपीकरणासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाच्या मदतीने नियोजनबद्ध पद्धतीने केलेला पैशांचा अपव्यय, हे प्रकार बंद झाले पाहिजेत, अशी पुणेकरांचा आग्रह आहे.
Summary

शहराच्या विद्रूपीकरणासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाच्या मदतीने नियोजनबद्ध पद्धतीने केलेला पैशांचा अपव्यय, हे प्रकार बंद झाले पाहिजेत, अशी पुणेकरांचा आग्रह आहे.

पुणे - फ्लेक्सद्वारे (Flex) चमकोगिरी, संकल्पनांच्या नावाखाली स्वतःच्या नावाचा उदोउदो करून घेण्याची नगरसेवकांना (Corporator) लागलेली सवय, नागरिकांच्या मूलभूत प्रश्‍नांपेक्षा केवळ दिखाऊ कामांसाठी केला जाणारा खर्च यावर निधीची (Fund) उधळपट्टी होत आहे. शहराच्या विद्रूपीकरणासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाच्या मदतीने नियोजनबद्ध पद्धतीने केलेला पैशांचा अपव्यय, हे प्रकार बंद झाले पाहिजेत, अशी पुणेकरांचा आग्रह आहे. ‘सकाळ’ने या विषयांवर मोहीम सुरू करून पोलखोल केली. यासंदर्भात महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार (Vikram Kumar) यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधला. फ्लेक्सबद्दलची मानसिकता बदलणार नसेल, तर कडक कारवाई करू, असे ते म्हणाले.

सर्वपक्षीय नगरसेवकांना सारखेच नियम!

बोर्डसंदर्भात आयुक्त म्हणाले, की नगरसेवक हे बाहेरचे नाहीत, ते नागरिकांनीच निवडून दिलेले असल्याने ते महापालिकेचाच घटक आहेत. संकल्पना म्हणून ते स्वतःचे नाव लावत असले, तरी त्यात गैर नाही. पण, कामाचे बोर्ड लावणे, दिशादर्शक फलक लावणे, सुशोभीकरणाचे काम असेल, तर तेथे कशा पद्धतीने नाव लावावे, रंग कोणता असला पाहिजे, फॉँट कोणता असेल, त्याचा आकार किती असेल, हे निश्‍चित करण्यासाठी प्रशासनाकडून धोरण तयार केले जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. तसेच, हे बोर्ड कुठे लावले पाहिजेत याचे ठिकाण निश्‍चित करण्याचे आदेशही दिले आहेत. हे नियम सर्वपक्षीय नगरसेवकांना सारखे असतील. त्यात बदल होणार नाही.

समान पाण्यासाठी महापालिका कटिबद्ध

समान पाणीपुरवठ्याविषयी आयुक्त म्हणाले, की शहरातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींकडे लक्ष देण्यास अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. तसेच, नागरिकांना तक्रार करता यावी, यासाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. नागरिकांनी त्यावर तक्रार केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडे ती पाठवून लोकांच्या तक्रारींचे निवारण केले जाईल. तसेच, समान पाणीपुरवठा योजनेचे काम वेगात पूर्ण करण्यासाठी नियोजन केले आहे. अंदाजपत्रकात त्यासाठी भरीव तरतूद केली आहे. समान पाणी देण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.

तुम्हीही चांगले मार्ग सुचवा

शहर सुधारण्याच्या दृष्टीने तुम्हालाही चांगले मार्ग माहीत असतील, तर ते आपल्या नावासह आम्हाला editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या क्रमांकावर कळवा.

फलक लावून शहर बकाल करू नका

फ्लेक्सबद्दल आयुक्त म्हणाले, की महापालिच्या अधिकाऱ्यांनी शहराच्या स्वच्छतेचा अभ्यास करण्यासाठी इंदूरचा दौरा केला, तेथे त्यांना कोठेही रस्त्यावर व पादचारी मार्गावर अनधिकृत फ्लेक्स दिसले नाहीत. केवळ अधिकृत ठिकाणीच जाहिरात लावल्या जातात. इतर ठिकाणीही फ्लेक्सचा वापर कमी होत आहे. अनधिकृतपणे लावल्या जाणाऱ्या फ्लेक्समुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहेच, शहराचे चित्र चांगले दिसत नाही. त्यामुळे पुणेकर नागरिकांनीदेखील फ्लेक्सचा वापर कमी केला पाहिजे, अशी माझी त्यांना हात जोडून प्रार्थना आहे. महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये आणि आकाशचिन्ह विभागामध्ये समन्वय साधून कारवाईचे प्रमाण वाढविले जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळही आम्ही उपलब्ध करून देत आहोत.

त्याचप्रमाणे शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यासाठी खासगी संस्था नियुक्त केली असून, त्यावरही कारवाई सुरू केली जाईल. रस्ते, पादचारी मार्ग अडवून लावल्या जाणाऱ्या फ्लेक्समुळे नागरिकांना धोका निर्माण होत आहे, त्यामुळे त्यावर कारवाई होणारच. तसेच, शहर घाण दिसेल असे फ्लेक्स लावू यासाठी सर्व राजकीय पक्ष, संघटनांची बैठक घेऊन त्यांचे प्रबोधन केले जाईल. त्यांना फ्लेक्स लावून शहर बकाल करू नका, अशी विनंती केली जाणार असून, हे विषय आमच्या प्रशासनाच्या अजेंड्यावर आहे.

स्वच्छ भारत अभियानामध्ये पुणे शहराचा देशात पाचवा क्रमांक आला आहे, शहराच्या स्वच्छतेसाठी उपाययोजना सुरू आहेत. तसेच, मोस्ट सस्टेनेबल सिटी म्हणून पुण्याला मान मिळाला आहे, स्वच्छता हा पुण्याचा गर्वाचा विषय आहे. त्यामुळे कायम सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे. त्यामध्ये रस्ते साफसफाई करण्यासाठी मशिन, कचरा उचलण्यासाठी जटायू मशिनचा वापर सुरू केला आहे. शहरातील रस्त्यावरचा कचरा दिसणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. तसेच, सेव्हन स्टार सिटीचा बहुमान मिळावा, यासाठी मैलापाण्याचा पुनर्वापर यावर भर दिला जात असून, जायका व ११ गावांचा प्रकल्प यातून ५१० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.

- विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com