टीईटी घोटाळाप्रकरणी त्रिपाठीला जामीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टीईटी घोटाळाप्रकरणी त्रिपाठीला जामीन
टीईटी घोटाळाप्रकरणी त्रिपाठीला जामीन

टीईटी घोटाळाप्रकरणी त्रिपाठीला जामीन

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : टीईटी परीक्षा घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले एजंट सौरभ त्रिपाठी याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश सी.व्ही. भडंग यांना हा आदेश दिला. या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला डिसेंबर २०२१ मध्ये उत्तरप्रदेश येथून अटक केली होती. अपात्र विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र दाखवण्याचे काम त्रिपाठी हा करत असल्याचा आरोप त्याच्यावरती ठेवला होता. त्रिपाठी याच्यावतीने ॲड.अनिकेत निकम यांनी मुंबई उच्च न्यायालयात बाजू मांडली. ज्या कंपनीला परीक्षा घेण्याची जबाबदारी २०१८ मध्ये सोपविण्यात आली होती. त्या कंपनीशी त्रिपाठी संबंधित नव्हता. तसेच या प्रकरणात त्यांना कुठल्याही प्रकारचा आर्थिक फायदा झाला नाही, असा युक्तिवाद ॲड. निकम यांनी केला.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top