डाटा हॅकच्या धमकीतून 
मागितली ११.५ कोटींची खंडणी

बजाज फायनान्सच्या संजीव बजाज यांच्यासह तिघांना ई-मेल

डाटा हॅकच्या धमकीतून मागितली ११.५ कोटींची खंडणी बजाज फायनान्सच्या संजीव बजाज यांच्यासह तिघांना ई-मेल

पुणे, ता. ९ ः अनोळखी व्यक्तींनी कंपनीचा डाटा हॅक करण्याची धमकी देऊन थेट बजाज फायनान्स कंपनीचे संजीव बजाज यांच्यासह तिघांना ई-मेलद्वारे ११ कोटी ६३ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खंडणी न दिल्यास कंपनीचे मोठे नुकसान करू, अशीही धमकी ई-मेलद्वारे दिली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी बजाज फायनान्सचे अधिकारी युवराज मोरे (वय ३२, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून ई-मेल पाठविणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संजीव बजाज, वरिष्ठ अधिकारी दीपक रेड्डी, दीपक बगाडी, संजीव यांना २८ नोव्हेंबरला natasa.petrova@protomail.com या ई-मेलवरून एक संदेश पाठविला होता. त्यामध्ये आम्हाला ११ कोटी ६३ लाख रुपयांची खंडणी द्यावी, अन्यथा कंपनीचा डाटा हॅक करून कंपनीचे मोठे नुकसान करू, खंडणीची रक्कम डोजे कॉइन या चलनाद्वारे पाठवावी, असा मजकुरात उलेख आहे. भारतीय चलनात आभासी चलनाचे मूल्य ११ कोटी ६३ लाख रुपये इतके होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी प्रारंभी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर सायबर पोलिसांनी याप्रकरणाचा अर्ज विमानतळ पोलिसांकडे पाठविला. त्यावरून अनोळखी व्यक्ती विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप करीत आहेत.
डोजे क्वाईन हे बिटकॉईन प्रमाणे आभासी चलन प्रकारातील चलन आहे. डोजे क्वाईन हे आभासी चलन परदेशातील काही संगणक अभियंत्यांनी एकत्र येऊन तयार केले आहे. अन्य सायबर गुन्हेगारांप्रमाणेच या गुन्ह्यातही खंडणीची रक्कम बिटकॉईन स्वरुपातील डोजे क्वाईन या आभासी चलनाद्वारे मागण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com