सरकारी कामाची पूर्तता करणारे ‘टेकिगो’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरकारी कामाची पूर्तता करणारे ‘टेकिगो’
सरकारी कामाची पूर्तता करणारे ‘टेकिगो’

सरकारी कामाची पूर्तता करणारे ‘टेकिगो’

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : देशात गेल्या काही वर्षांत नव्याने स्थापन होत असलेल्या आस्थापनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. सर्वच क्षेत्रातील नागरिकांचा उद्योजकतेकडे वाढणारा कल यातून स्पष्ट होतो. त्याच वेळेला असे पण दिसून येते की, स्थापन झालेल्या सुमारे ४० टक्के आस्थापनांकडून काही ना काही कारणांमुळे सरकारी नियमांची पूर्तता होत नाही. वेळेत नियमांची पूर्तता न केल्याने त्याचे गंभीर परिणाम नव उद्योजकांना भोगावे लागतात.
नव उद्योजकांच्या या परिस्थितीचा आढावा घेत त्यांची अडचण दूर करण्यासाठी स्टार्टअपच्या सरकारी कामाची पूर्तता करणारे ‘टेकिगो’ (tekigo) हे स्टार्टअप स्थापन झाले आहे.
सर्व नव उद्योजक आपल्या कामात व्यस्त असल्याने तसेच व्यवसाय वृद्धीसाठी वेळ देता यावा यासाठी त्यांना आस्थापनेच्या इतर कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी वेळच मिळत नसल्याचे टेकिगोने केलेल्या सर्वेतून समोर आले आहे. या स्टार्टअपच्या माध्यमातून अनेक नवव्यवसायिकांच्या समस्या सोडविण्यात आल्या आहेत. आआयएम अहमदाबादचे विद्यार्थी असलेले सतीश चंद्रा आणि राज्याच्या र्इ-निविदा प्रकल्पाची धुरा सांभाळलेले निखिल कुलकर्णी यांनी गेल्या वर्षी पुण्यात या स्टार्टअपची सुरवात केली आहे.

संचालक होता येत नाही
आस्थापनेशी निगडित सरकारी नियमाची साधारण तीन वर्षांत सरकारी नियमांची पूर्तता ना केल्यास आस्थापना बंद करण्याची तरतुदीचा वापर करून ती बंद करण्याचे अधिकार सरकारला आहेत. तसेच संबंधित संचालकांना पाच वर्षे कुठल्याही आस्थापनेचा संचालक होता येत नाही. तसेच नवीन आस्थापना (कंपनी) स्थापन करता येत नाही, असा सरकारचा कायदा असल्याची माहिती स्टार्टअपकडून देण्यात आली.

अशी होते प्रक्रियेची पूर्तता
टेकिगोने विकसित केलेल्या कॉप्लिमेंट (Compliment) प्रणालीद्वारे कंपनी कायदा २०१३ च्या अंतर्गत येणाऱ्या अटी शर्तींची पूर्तता करणे सहज होते. या प्रणालीचा वापर हा स्टार्टअप किंवा इतर नवव्यवसायिकांपुरता मर्यादित नसून सीए आणि सीएस देखील त्याचा वापर करू शकतील. या व्यतिरिक्त ज्या नव-उद्योजकांना आपली आस्थापना स्थापन करायची इच्छा आहे, अशा उद्योजकांना टेकिगोच्या कॉप्लिमेंटद्वारे आस्थापना स्थापन (कंपनी रजिस्ट्रेशन) करता येऊ शकते. या प्रणालीमुळे व्यावसायिकांना सरकारी नियमांची पूर्तता सहजपणे अतिरिक्त दंड न भरता करता येते. तसेच त्यात वेळ न गेल्याने कंपन्यांना आपल्या धेय्यावर लक्ष केंद्रित करणे सहज शक्य होते.

उद्योजकांकडे नियमाच्या पूर्ततेसाठी कंपनीची स्थापन करून देणाऱ्या व्यक्तीकडून सतत पाठपुरावा केला जातो. पण खूप कमी वेळा त्यांना त्यात यश मिळते. कॉप्लिमेंट प्रणाली ही इंटरनेट जाणकार असणारे उद्योजक, प्रोफेशनल आणि सरकारी नियमाच्या पूर्ततेसाठी एक दुवा बनून, नवीन स्थापन झालेल्या अथवा होत असलेल्या आस्थापनेना सरकारी नियमाची वेळेवर पूर्तता करून सुसंगत ठेवण्यात मदत करेल.
- सतीश चंद्रा आणि निखिल कुलकर्णी, संस्थापक, टेकिगो

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या
संकेतस्थळावरील माहितीनुसार
- एप्रिल २०१७ ते डिसेंबर २०२१ दरम्यान स्थापन कंपन्या -७, ९०, ९४७
- २०१८ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत सरकारने बंद केलेल्या कंपन्या - ३,९४, ९७५
- २०१७ साली स्थापन झालेल्या सव्वा लाखापैकी ३४, १४९ कंपन्या बंद करण्यात आल्या

कंपन्या बंद करण्याची कारणे
- तीन वर्ष नियमांची पूर्तता केली नाही
- दोन वर्षांत व्यवसाय सुरू केला नाही

- १८० दिवसांत बिझनेस कमेन्समेंट प्रमाणपत्र घेतले नाही

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top