औंधला होणार प्राण्यांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औंधला होणार प्राण्यांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय
औंधला होणार प्राण्यांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय

औंधला होणार प्राण्यांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : शहरात प्राण्यांवर उपचार करण्यासाठी राज्य शासनाच्या जिल्हा पशू संवर्धन खात्यातर्फे औंध येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये पुणे महापालिका, पिंपरीचिंचवड महापालिका यांच्याकडूनही सहकार्य केले जाणार आहे. यासाठी पुणे महापालिका तीन कोटी रुपये देणार आहे.
शहरात सुमारे दीड लाख भटकी कुत्री आहेत, त्यासह इतर प्राणी आहेत. महापालिकेत ३४ गावे समाविष्ट झाल्याने तेथील भटकी कुत्रे आणि मोकाट प्राण्यांचा भार महापालिकेवर निर्माण झाला आहे. महापालिकेने या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी चार संस्थांची नियुक्ती झाली असली तरी अजून पूर्ण क्षमतेने त्यांचे काम सुरू झालेले नाही. शहरात रोज किमान १५ ते २० कुत्रे अपघातामध्ये जखमी झाल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येतात, पण महापालिकेचे प्राण्यांचे रुग्णालय नसल्याने त्यांच्यावर उपचार करता येत नाहीत. त्यामुळे प्राण्यांच्या रुग्णालयाची आवश्‍यकता आहे.
राज्‍य शासनाच्या पशू संवर्धन विभागाने पुण्यात औंध येथे प्राण्यांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे आर्थिक सहकार्य केले जाणार आहे. पुणे महापालिकेकडून तीन कोटी रुपये देण्याचा निर्णय नुकताच स्थायी समितीने घेतला आहे.
हे रुग्णालय उभे राहिल्यास मोकाट कुत्र्यांवर उपचार करण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे महापालिकेकडून पाळीव कुत्र्यांसाठी परवाना दिला जातो. अशा श्‍वानांसाठी या रुग्णालयामध्ये सवलतीच्या दरामध्ये एक्सरे, एमआरआय, सोनोग्राफी, रक्त तपासणी यांच्या सारख्या सुविधा उपलब्ध होऊ शकतात. तसेच पुणे महापालिकेच्या हद्दीत हे रुग्णालय सुरू होणार आहे, त्यासाठी महापालिकेने आर्थिक मदत केल्याने शहरातील जखमी श्‍वानांसाठी ५० केलेन्स राखीव ठेवल्या जाणार आहेत, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..