पुण्यातील दोन महिलांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील दोन महिलांची फसवणूक
पुण्यातील दोन महिलांची फसवणूक

पुण्यातील दोन महिलांची फसवणूक

sakal_logo
By

पुणे, ता. ७ ः सोन्याचे बिस्कीट देण्याचा बहाणा करून दोन महिलांच्या हातात पिवळ्या धातूचे बिस्कीट देत, त्यांच्याकडील सव्वालाखांचे दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कात्रज येथील बसस्थानकावर घडली.
याप्रकरणी दोन महिलांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला बुधवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास कात्रज येथील पीएमपी बसथांब्यावर थांबल्या होत्या. त्यावेळी अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. त्यापैकी एका महिलेस त्यांनी त्यांच्याकडील पिवळ्या धातूचे चौकोनी आकाराचे बिस्कीट दाखविले. ते बिस्कीट सोन्याचे असल्याचे भासवून ते बिस्कीट महिलेस देऊन महिलेकडील ५० हजार रुपयांचे दागिने काढून घेतले. याच पद्धतीने दुसऱ्या महिलेचाही विश्‍वास संपादन करून आरोपींनी तिलाही नकली बिस्कीट देऊन तिच्याकडील ७८ हजार रुपयांचे दागिने काढून घेतले. दरम्यान, त्यांना दिलेले बिस्कीट हे सोन्याचे नसून दुसऱ्याच धातूचे लक्षात आल्यानंतर महिलांनी पोलिसांकडे धाव घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..