revenue
revenue sakal

पुण्यातून ‘रेकॉर्ड ब्रेक’ महसूल

राज्यात सर्वाधिक दस्तनोंदणी, तिजोरीत ६ हजार ८३४ कोटींची भर

पुणे : एकट्या पुणे शहराने दस्तनोंदणीतून राज्याच्या तिजोरीत ६ हजार ८३४ कोटी रुपयांची भर घातली आहे. विशेषतः गेल्या दहा वर्षीतील सर्वात कमी दस्तनोंदणी होऊनदेखील सर्वाधिक उत्पन्न पुण्याने मिळून दिले आहे. यातून पुणे हे राज्यात सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर असल्याचे अधोरेखित होत आहे.गेल्या दहा वर्षातील गेल्या वर्षी (२०२१-२२) सर्वात कमी दस्तनोंदणी होऊनदेखील रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळाले असल्याचे समोर आले आहे. २०१२-१३ मध्ये पुणे शहरात २ लाख २८ हजार दस्तनोंदणी झाली होती.

त्यातून ३ हजार ३६७ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. त्यानंतर सातत्याने शहरातील दरवर्षी दस्तनोंदणीचा आकडा हा २ लाख ४७ हजाराच्या वर राहिला. २०१५-१६ मध्ये दस्तनोंदणीची संख्या २ लाख ८५ हजारांपर्यंत गेली होती. त्यावेळी देखील ३ हजार ५३८ कोटी रुपयांची उत्पन्न मिळाले होते. मात्र, २०१९-२० मध्ये मात्र काहीशी मंदी आल्याने त्या वर्षी २ लाख ३५ हजार दस्तनोंदणीतून ४ हजार ९३७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. मात्र, गेल्या वर्षी २ लाख ३७ हजार १३७ दस्तनोंदणीतून ६ हजार ८३४ कोटी ४० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर मुंबई विभागात ८ हजार ८११ कोटी ९६ लाख रुपयांची उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे राज्यात दस्तनोंदणीतून सर्वाधिक महसूल मिळवून देणारे शहर हे पुणे ठरले आहे.

का वाढले उत्पन्न
१) महापालिकेच्या हद्दीत १९९७ मध्ये २३ गावे समाविष्ट झाले. त्यानंतर टप्प्याटप्याने ११ गावे आणि २३ गावे समाविष्ट झाली. त्यामुळे पुणे शहराचा विस्तार हद्द चारशे चौरस किलोमीटरहून अधिक झाल्याने राज्यातील सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेले शहर ठरले आहे. यावरून पुणे शहराचा वाढीचा वेग समोर येतो.
२) सुरवातीला विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराची गेल्या काही वर्षात माहिती तंत्रज्ञान, ॲटोमोबाईल हब, मेट्रो सिटी अशी नवीन ओळख निर्माण होत आहे. त्यामुळे देशभरातील तरुणांकडून करियरसाठी पुण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे.
३) कोरोना महामारीने स्वतःच्या घराचे महत्त्व स्पष्ट झाले. साथरोग उद्रेकात वन बीएचकेची मर्यादा स्पष्ट झाली. त्यामुळे दोन, अडीच आणि तीन बीएचकेंना महत्त्व प्राप्त झाल्याने देखील व्यवहारात वाढ झाली.
४) नोंदणी झालेल्या दस्तनोंदणीपैंकी सत्तर टक्के सदनिकांच्या खरेदीच्या आहेत. त्यामुळे व्यावसायिकांपेक्षा स्थायिक होण्यासाठी पुण्याला पसंती
५) मुबलक पाणी, चांगले हवामान आणि सुरक्षितता यामुळे अनेकांचा कल पुण्याकडे वाढत आहे.

असा वाढत गेला महसूल
वर्ष दस्तनोंदणी संख्या (लाखात) मिळालेले महसूल (कोटी रूपयांत)
२०१२-१३ २.२८ ३३६७
२०१३-१४ २.४७ ३५४५
२०१४-१५ २.६१ ३५८०
२०१५-१६ २.८५ ३५३८
२०१६-१७ २.५८ ३९५९
२०१७-१८ २.६६ ३८२३
२०१८-१९ २.६० ४४४५
२०१९-२० २.३५ ४९३७
२०२०-२१ २.४८ ४७२८
२०२१-२२ २.३४ ६८३४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com