आंबेठाणमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेठाणमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन
आंबेठाणमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन

आंबेठाणमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन

sakal_logo
By

आंबेठाण, ता.१३ : स्मार्ट व्हिलेज आंबेठाण (ता.खेड) येथे ग्रामनिधी आणि १५ व्या वित्त आयोगातून विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच संघमित्रा नाईकनवरे यांनी दिली आहे. यावेळी जवळपास १७ लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
आंबेठाण गावठाण अंतर्गत अडीच लाख रुपये किमतीचा सिमेंट रस्ता, दवणे मळा येथे प्रत्येकी साडेतीन लाख रुपये किमतीचे दोन सिमेंट रस्ते तसेच दवणे मळा येथील जिल्हा परिषद शाळेसाठी सात लाख रुपये किमतीचे शौचालय आदी विकासकामांचा समावेश आहे.
याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच संघमित्रा नाईकनवरे, लक्ष्मण भालेराव, दत्तात्रेय नाईकनवरे, शंकर मांडेकर, शांताराम चव्हाण, अमोल दवणे, भानुदास दवणे, बापू दवणे, बबन घाटे, माणिक दवणे, संदीप दवणे, ग्रामविकास अधिकारी रवींद्र उगले आदी उपस्थित होते.

02184

Web Title: Todays Latest Marathi News Abt22b01505 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top