वराळेत ग्रामपंचायतीला आकर्षक रोषणाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वराळेत ग्रामपंचायतीला आकर्षक रोषणाई
वराळेत ग्रामपंचायतीला आकर्षक रोषणाई

वराळेत ग्रामपंचायतीला आकर्षक रोषणाई

sakal_logo
By

आंबेठाण, ता. १६ : चाकणमध्ये विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. वराळे (ता. खेड) येथे हर घर तिरंगा मोहिमेचा प्रचार करण्यासाठी गावात डिजिटल स्क्रीनद्वारे जनजागृती करण्यात आली. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना मोफत राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले. या वेळी तीन दिवस ग्रामपंचायत कार्यालय व शाळेला विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

पहिल्या दिवशी गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी सुदाम पडवळ, पांडुरंग थोरात, नारायण आंद्रे, पोपट बुट्टे यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. तर दुसऱ्या दिवशीचे ध्वजवंदन गावातील विधवा प्रथा बंद करण्यासाठीचे पाऊल उचलत असताना पवना बुट्टे, रतन बुट्टे, बबाबाई बुट्टे, छाया बुट्टे, अलका लोंढे, अंजनाबाई ठाकर या विधवांच्या हस्ते करण्यात आले. तर सरपंच दिनेश लांडगे यांचे हस्ते वराळे शाळेत ध्वजवंदन करण्यात आले.

या प्रसंगी वराळे शाळेत प्रभात फेरी, साहित्य कवायत, मनोरे, ॲरोबिक्स, समूहगान, भाषणे आदी कार्यक्रम घेण्यात आले. या वेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी कॉर्निंग कंपनीकडून शाळेसाठी बसविण्यात आलेल्या आरओ प्लांटचे उद्‍घाटन करण्यात आले. या प्रसंगी सरपंच दिनेश लांडगे, उपसरपंच सुनीता ठाकर, अविनाश लोंढे, पूजा बुट्टे, बाळासाहेब ठाकर, शुभांगी बुट्टे, उज्ज्वला चव्हाण, ग्रामसेवक विकास विशे, तलाठी बंडेश औटे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Abt22b01559 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..