त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बाणेश्वर मंदिरात दीपोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बाणेश्वर मंदिरात दीपोत्सव
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बाणेश्वर मंदिरात दीपोत्सव

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बाणेश्वर मंदिरात दीपोत्सव

sakal_logo
By

बालेवाडी, ता. ९ : बाणेर येथील बाणेश्वर मंदिरात बाणेश्वर सेवा ट्रस्ट कडून त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरात फुलांची सजावट आणि दोन हजार दिवे लावून दीपोत्सव साजरा केला.
बाणेर गावठाण येथे पांडवकालीन लेणी स्वरूपात असलेले बाणेश्वर देवस्थान म्हणजे बाणेरकरांचे आराध्य दैवत. या ठिकाणी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बाणेश्वर सेवा ट्रस्ट व गावातील भाविकांनी एकत्र येऊन मंदिराचा गाभारा व मंदिर परिसरात दोन हजार दिवे लावून मंदिर व परिसर दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला.
बाणेश्वर मंदिर ''हर हर महादेव'' च्या जयघोषाने दुमदुमून निघाले. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मोगरा, गुलाबाच्या फुलाची मनमोहक सजावट केली. सायंकाळी साडेसातच्या दरम्यान या दीपोत्सवाचे आयोजन केले. यावेळी मंदिरातून यथासांग पूजा करून, आलेल्या भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.