नवले पुलालगत सेवा रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवले पुलालगत 
सेवा रस्त्यावरील
अतिक्रमणे हटविली
नवले पुलालगत सेवा रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली

नवले पुलालगत सेवा रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली

sakal_logo
By

धायरी, ता. २२ : नवले पूल येथील अपघाताची मालिका लक्षात घेता सेवा रस्त्यावरील अतिक्रमणे  मंगळवारी काढण्यात आली. या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडचणी येत होत्या. नवले पूल ते मुठा नदीपर्यंत बेकायदा कच्ची व पक्की बांधकामे पाडून टाकण्यात आली. नवले पुलापर्यंत कारवाई करण्यात आली. राहिलेली कारवाई उद्या बुधवारी करण्यात येणार आहे.
मुंबई-बंगळूर बाह्यवळण महामार्गावर अपघातांचे सत्र कायम आहे. रविवारी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास बाह्य वळणावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकच्या धडकेने तब्बल २४ वाहनांचे नुकसान झाले. तर या अपघातात १३ जण जखमी झाले असून या सर्व जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर, खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, पुणे महापालिकेचे अतिरिक्त कुणाल खेमणार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक आणि राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी संजय कदम, वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्यासह अधिकारी वर्गानेही घटनास्थळी भेट देऊन चर्चा केली. त्याचवेळी अतिक्रमणे हटविण्याचे निश्चित करण्यात आले होते.

कारवाईसाठी फौजफाटा
- १० पोलिस अधिकारी, १६० पोलिस कर्मचारी
- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे १० अधिकारी, ५ अभियंते, ४० कर्मचारी
- महामार्ग गस्ती पथकाचे २० कर्मचारी
- सात डंपर, एक पोकलेन, तीन जेसीबी, दोन क्रेन, एक रुग्णवाहिका

काय काय पाडले?
- ७० ते ८० टपऱ्या
- २० ते २५ हॉटेल समोरील अतिक्रमणे
- १२५ पेक्षा जास्त कच्ची बांधकामे

जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत सेवारस्त्यावरील अतिक्रमणे त्वरित काढून टाकण्याचे निश्चित करण्यात आले. त्यांच्या आदेशाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने मोहीम राबविण्यात येत आहे. सेवा रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई करून नऊ मीटर रस्ता ताब्यात घेऊन रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे.
- अनिकेत यादव, साह्ययक प्रकल्प अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण