हिंदू समाजाची मोट बांधणार ः कालीचरण महाराज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदू समाजाची मोट बांधणार ः कालीचरण महाराज
हिंदू समाजाची मोट बांधणार ः कालीचरण महाराज

हिंदू समाजाची मोट बांधणार ः कालीचरण महाराज

sakal_logo
By

धायरी, ता. ११ ः जात, भाषा, प्रांत अशा वादांमध्ये अडकलेल्या हिंदू समाजाची मोट बांधणे हेच साधूंचे कार्य आहे. समाजाचे हित साधणारा तो साधू या न्यायाने मी माझे कार्य करीत आहे, असेही कालीचरण महाराज यांनी आज सांगितले.
धर्मजागरण सभेच्या निमित्ताने पुण्यात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सभेचे आयोजक शिवसमर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक दीपक नागपुरे, पुणे शहर भाजपचे प्रवक्ते अली दारुवाला आदी उपस्थित होते. ते म्हणाले, ‘‘हिंदू मुलींनी इतर धर्मीयांशी केलेल्या विवाहाचे परिणाम आपण बघतोच आहोत. लव्ह जिहादच्या दररोज घटना घडत आहेत. याला आळा घालण्यासाठीही हिंदूंनी संघटित होणे गरजेचे आहे. धर्मनिरपेक्ष हा शब्द घटनादुरुस्तीद्वारे भारतीय संविधानात घुसविला आहे. त्यामुळे अशा बेगडी धर्मनिरपेक्षतेला काहीच अर्थ नाही. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी योगी आदित्यनाथ अतिशय प्रभावी काम करत असून, देशभरातल्या समस्त हिंदूंच्या संघटनांचे नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्या अंगी आहे. भविष्यात रामराज्य आणण्याचे स्वप्न ते साकार करू शकतात.’’