वडगाव बुद्रूकला आसूड आंदोलन

वडगाव बुद्रूकला आसूड आंदोलन

धायरी, ता. २६ : वडगाव बुद्रूक परिसरातील वाहतूक समस्येकडे पुणे महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याच्या निषेधार्थ आज वडगाव बुद्रुकमध्ये माजी नगरसेवक हरिदास चरवड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रतिकात्मक पोतराजाच्या उपस्थितीत प्रशासनाच्या निषेधार्थ आसूड आंदोलन झाले. आमदार भीमराव तापकीर यांच्या उपस्थितीत पालिका अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
वडगाव बुद्रूक स. नं. ५४, ५६, ५७, ६२ मधून मुंबई -बंगळूर महामार्ग गेला आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी महापालिकेचा १२ मीटर सेवा रस्ता आहे. त्याचे काम अर्धवट राहिले असून काही जागा मालकांच्या आडमुठ्या धोरणामुळे नागरिकांना वेठीस धरले जात आहे. ज्याठिकाणी अतिक्रमण झाले आहे, त्या ठिकाणी रस्ता अरुंद झाला असून नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. तसेच असंख्य अपघातात शेकडो नागरिकांचे प्राण गेले आहेत.
याबाबत चरवड म्हणाले, ‘‘मंजूर निधी परत गेला आहे. अतिक्रमणविरोधी कारवाईही होत नाही. त्यामुळे आंदोलन करावे लागले.’’ या वेळी ॲड. रामचंद्र कर्डिले, सचिन वांजळे, योगेश दांगट, सारंग नवले, केरबा चरवड, सचिन चरवड, बापूसाहेब पठारे आदींसह नागरिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com