
डोर्लेवाडीत आरोग्य शिबिरात २९५ रुग्णांची तपासणी
डोर्लेवाडी, ता. ५ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील तरुण मंडळांनी राबविलेले आरोग्य शिबीर, क्रीडा स्पर्धा, पोलिस भारती मार्गदर्शन व्याख्यान, नृत्य स्पर्धा, मतदान जागृती आदी सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहेत. येथील मंडळांचा आदर्श घेण्यासारखा आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी व्यक्त केले.
जय तुळजाभवानी तरुण मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी होळकर बोलत होते. बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, सरपंच पांडुरंग सलवदे, छत्रपती कारखान्याचे माजी संचालक रमेश मोरे, खरेदी विक्री संघ संचालक ज्ञानदेव नाळे, प्रा.अंकुश खोत, ग्रामपंचायत सदस्य शहाजी दळवी, पुष्पलता मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी मनोज खोमणे, बापूराव गवळी, रणजित मोरे, विजय घोरपडे, विनोद नवले, अजित वामन, मंडळाचे अध्यक्ष मल्हारी मदने, उपाध्यक्ष विशाल काळेबेरे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी हृदयरोग व मधुमेह विकार तज्ञ हनुमंत गोरड, नेत्र विकार तज्ञ स्नेहल काळे यांनी शिबिरात २९५ रुग्णांची तपासणी करून उपचार केले.