फुरसुंगी व उरुळी देवाची
नगरपरिषदेला नागरिकांचा विरोध

फुरसुंगी व उरुळी देवाची नगरपरिषदेला नागरिकांचा विरोध

फुरसुंगी, ता. १ : नवीन नगरपरिषदेचा फुरसुंगी व उरुळी देवाची या दोन गावांसाठी सरकारी आदेश होऊन दोन होत नाहीत. तो पर्यंत या दोन गावांमध्ये निर्णयाला विरोध केला जात आहे. त्यामुळे या गावांमध्ये नगरपरिषद विरुद्ध महापालिका असा वाद सुरू आहे. नवीन नगरपरिषद विरोधात फुरसंगीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य शंकरनाना हरपळे, माजी पंचायत समिती सभापती दिनकर हरपळे, माजी सभापती अनिल टिळेकर, माजी उपसरपंच संजय हरपळे, माजी ग्रामपंचायत सदस्य राजू होले, राहुल चोरघडे, सुहास खुटवड, अमित हरपळे, नितीन काळे, किरण हरपळे, किरण सरोदे, सागर हरपळे, अप्पा कसबे आदी उपस्थित होते.
पालिकेच्या मिळकत कर आणि मूलभूत सुविधांना होणार उशीर, या मुद्यांवरून फुरसुंगी व उरुळी देवाची येथील नागरिकांनी स्वतंत्र नगरपरिषदेची मागणी केली होती. ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य करून त्यांना नवीन नगरपरिषदेचा सरकारी आदेश दिला. या निर्णयाला नागरिकांकडून विरोध होत असून नवीन नगरपरिषदेची मागणी करताना संपूर्ण गावाची सहमती नव्हती.

बहुतांशी नागरिकांचा मिळकत कराबाबत नाराजी होती. मात्र, महापालिकेला विरोध नव्हता. पालिकेत गावाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. नवीन नगरपरिषद निर्णयाच्या विरोधात न्यायालयात जात आहोत.
- अमोल हरपळे, सदस्य, जिल्हा नियोजन समिती

मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांशी मिळकत कराचा आणि जलदगतीने मूलभूत सुविधा देण्यावर चर्चा करून प्रश्न मार्गी लावला असता, तर नवीन नगरपरिषदेची आवश्यकता उरली नसती. ३४ समाविष्ट गावांमध्ये ही हीच समस्या आहे. मात्र, केवळ हीच दोन गावे का? वगळण्यात आली.
- गणेश ढोरे, माजी नगरसेवक, फुरसुंगी

फुरसुंगी : नागरिकांनी नगरपरिषदेविरोधात घोषणा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com