Sun, Sept 24, 2023

पूर्व भागात पावसाची दमदार हजेरी
पूर्व भागात पावसाची दमदार हजेरी
Published on : 4 June 2023, 5:00 am
फुरसुंगी, ता. ४ : शहराच्या पूर्व भागात रविवारी पावसाने तासभर झोडपले. फुरसुंगी, उरुळी देवाची, वडकी, उंड्री, पिसोळी या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. रविवारी दुपारनंतर साधारण तीन वाजण्याच्या सुमारास या भागात पावसाला जोरदार सुरुवात झाली. तासाभराने पावसाचा जोर कमी झाला. अचानक आलेल्या पावसामुळे सुट्टीचा दिवशी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची धांदल उडाली.