
निर्मिती प्रधान, सृजनशील शिक्षण हवे
विषय ः शिक्षण
काही क्षेत्रात रोजगाराच्या संधी असूनही मनुष्यबळाची मोठी पोकळी निर्माण झाली. अशा प्रकारची सर्वात मोठी पोकळी ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग डिझाईन, एक्सटेंडेड रिॲलिटी या क्षेत्रात निर्माण झाली आहे. याक्षेत्रात २०३० पर्यंत लाखों रोजगार निर्माण होऊ शकतात, म्हणून केंद्र सरकारने यावर्षी अर्थसंकल्पात एव्हीजीसी टास्कफोर्स स्थापन करण्याची घोषणा केली. शिक्षणानंतर रोजगाराची खात्री ज्यांना हवी आहे, त्यांनी या क्षेत्रात करिअर करावे. भारतीयांची सृजनशीलता आणि तंत्रज्ञान आत्मसात करण्याची क्षमता यामुळे या क्षेत्रात भारत येणाऱ्या काळात जगाचे नेतृत्व करेल. आजच्या डिजिटल युगात या क्षेत्रातील शिक्षणाने विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील करियरच्या संधी निर्माण होतील. डिजिटल डिझाईन क्षेत्रातल्या शिक्षणासाठी पारंपरिक शिक्षण पद्धती योग्य ठरणार नसून यासाठी कौशल्य विकासापेक्षा निर्मिती प्रधान व सृजनशील शिक्षणाची आवश्यकता आहे. गेल्या १६ वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रातील शिक्षण देण्याचे काम करताना आता पुण्यातील सृजन कॉलेज ऑफ डिझाईनच्या वतीने निर्मिती मूल्ये वाढवणारे व या क्षेत्रासाठी संशोधन करणारे प्रशिक्षण केंद्र उभारत आहे. येथे विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतच्या शिक्षणासोबत संशोधन आणि निर्मितीचा प्रत्यक्ष अनुभव दिला जाणार आहे.
- संतोष रासकर,
संचालक, सृजन कॉलेज ऑफ डिझाईन
Web Title: Todays Latest Marathi News Gkn22b01437 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..