निवृत्तीनंतर लोकसेवेची निःस्वार्थी ओढ (सकारात्मका) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवृत्तीनंतर लोकसेवेची निःस्वार्थी ओढ (सकारात्मका)
निवृत्तीनंतर लोकसेवेची निःस्वार्थी ओढ (सकारात्मका)

निवृत्तीनंतर लोकसेवेची निःस्वार्थी ओढ (सकारात्मका)

sakal_logo
By

समाधान काटे

शिवाजीनगर, ता. ८ : बॅंक ऑफ महाराष्ट्रमधील ३८ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालेल्या सुरेश परांजपे यांनी उर्वरित आयुष्यात आराम करण्यापेक्षा सामाजिक जबाबदारी म्हणून एक वेगळी वाट धरली आहे. त्यातूनच गेल्या ९ वर्षांत त्यांनी गरजूंना दानशूर व्यक्तींकडून तब्बल ५५ लाख रुपयांची मदत मिळवून दिली आहे. अखेरच्या श्वासापर्यंत हे व्रत जोपासण्याचा त्यांचा निर्धार आहे.

बॅंकेत लिपिक या पदावर कार्यरत असताना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बॅंक अधिकारी या महत्त्वाच्या पदावर त्यांना बढती मिळाली, पण परांजपे यांनी ती नाकारली अन् विशेष कार्यकारी अधिकारी हे पद स्वीकारले. त्याचे कारण सांगताना परांजपे म्हणाले, ‘‘कर्मचारी सोसायटीचा मी संचालक असल्यामुळे अनेक कर्मचारी सोसायटीत कर्ज घेण्यासाठी येत. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोसायटीचे कर्ज मंजूर करणे, त्यांच्या कागदपत्रांची छाननी करणे, संबंधित कर्ज प्रकरण कायद्याच्या चौकटीत योग्यरीत्या बसवून कर्ज मंजूर करून निःस्वार्थी मदत करायची ती संधी होती.’’

परांजपे हे महाबॅंकेतून २०१२ मध्ये निवृत्त झाले. निवृत्तीनंतर सामाजिक कार्याची आवड जोपासत शहरातील बँकेच्या विविध शाखांना भेट देऊन, सामाजिक संस्था, विद्यार्थ्यांसाठी देणगीची मदत मागत, अनेक शाखांमधून त्यांना मदत मिळाली. एकाही शाखेतून रिकाम्या हाताने ते परतले नाहीत. मिळालेल्या मदतीतून विना अनुदानित जीवनवर्धिनी मतिमंद विद्यालयाच्या (दिवे) दहा खोल्यांचे बांधकाम पूर्ण केले. बाबा आमटे यांच्या आनंदवनसाठी कपडे भांडी, मूकबधिर मुलांना श्रवण यंत्र वाटप, नाम फाउंडेशनला भरघोस रक्कम, लोखंडे प्रतिष्ठान कामशेत, जीवन ज्योत विशेष मुलांची शाळा, आगरकर शाळा, दहावीत शिकणाऱ्या ६२ विद्यार्थ्यांना फी मिळवून देणे, ज्ञानदा, आपटे, मॉडर्न, वंचित विकास संस्था अशा विविध शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत त्यांनी केली. यासह गरजू नागरिक, गिरणी कामगारांना कपडे, धान्य स्वरूपात मदत करणे, पंतप्रधान, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी लाखो रुपयांची मदतही मिळवून दिली. या कार्यासाठी त्यांच्या पत्नी स्नेहा परांजपे व जावई जितेंद्र हिंगमिरे यांची त्यांना साथ मिळते.
लिपिक म्हणून प्रदीर्घ काळ काम केल्यामुळे सगळ्या नोंदीही परांजपे यांच्याकडे आहेत. अखेरपर्यंत या नोंदी ठेवण्यासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

- बॅंकेत असलेली अनामत रक्कम काढण्यासाठी ऐंशी वारसदारांना कायदेशीर सल्ला देऊन प्रत्यक्ष मदत करून रक्कम काढून दिली. यासह इच्छापत्राबाबतची माहिती १४० नातेवाइकांना दिल्याचे परांजपे यांनी सांगितले.

आपली संस्कृती सांगते की, आपण कोणतीही अपेक्षा न करता भूकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी द्यावं. आपण आर्धी भाकरी खा पण उपेक्षित समाजाला मदत करा.
- सुरेश परांजपे

Web Title: Todays Latest Marathi News Gkn22b01575 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..