‘स्त्री शक्ती कायदा’ हे न्यायाकडे नेणारे आयुध ः डॉ. गोऱ्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘स्त्री शक्ती कायदा’ हे न्यायाकडे नेणारे आयुध ः डॉ. गोऱ्हे
‘स्त्री शक्ती कायदा’ हे न्यायाकडे नेणारे आयुध ः डॉ. गोऱ्हे

‘स्त्री शक्ती कायदा’ हे न्यायाकडे नेणारे आयुध ः डॉ. गोऱ्हे

sakal_logo
By

शिवाजीनगर, ता. ७: ‘‘जसं गणपतीच्या हातांमध्ये आयुध आहे, त्याप्रमाणे स्री शक्ती कायदा महिलांना न्यायाकडे नेणारे आयुध आहे,’’असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीने ‘तुळशीबाग स्री शक्ती सन्मान’ सोहळा रविवारी (ता.७) आयोजित करण्यात आला होता. यावेळी गोऱ्हे बोलत होत्या. महिलांवरील अन्याय दूर करण्यासाठी या कायद्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मंडळाच्यावतीने दरवर्षी गणेशोत्सवात ‘एक दिवस महिलांचा’ हा उपक्रम आयोजित केला जातो. समाजातील कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात येते. यावर्षी अनुराधा संचेती, वैशाली माशेलकर, डॉ. विद्या येरवडेकर, शैला दातार, डॉ. संजीवनी इनामदार, डॉ. स्वाती दैठणकर, गौतमी देशपांडे यांना डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमात सन्मानित महिलांच्या मुलाखती डॉ. शैलेश गुजर यांनी घेतल्या. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडित महिला व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ssociated Media Ids : GKN22B02948

Web Title: Todays Latest Marathi News Gkn22b01591 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..