व्यापाऱ्याला विक्री केले जाणारे रेशनचे धान्य जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यापाऱ्याला विक्री केले 
जाणारे रेशनचे धान्य जप्त
व्यापाऱ्याला विक्री केले जाणारे रेशनचे धान्य जप्त

व्यापाऱ्याला विक्री केले जाणारे रेशनचे धान्य जप्त

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : रेशनवर दोन, तीन रुपये किलोने मिळालेले धान्य व शालेय पोषण आहारातील हरभरा नागरिकांनी व्यापाऱ्याला विकताना परिमंडल ‘क’च्या अधिकारी संगीता खोमणे यांनी पकडला आहे.

शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट गल्ली क्रमांक एक या ठिकाणी परिमंडळ अधिकारी खोमणे या तेजस महिला बचत गट या रेशन दुकानाची पाहणी करण्यासाठी गेल्या असता तीन इसम तराजू व पोती घेऊन नागरिकांकडून धान्य विकत घेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संबंधित इसमांकडे खोमणे या जात असताना अचानक तिघेही तिथून धावत सुटले. एका तरुणाला पकडण्याचा खोमणे यांनी प्रयत्न केला. परंतु धक्का देऊन तो पसार झाला. दरम्यान, जप्त करण्यात आलेले धान्य शासकीय गोदामात जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रेशन दुकानदार शासकीय नियमाप्रमाणे धान्य देतात. नागरिकांनी त्याचा वापर करायला हवा. शासनाकडून मिळालेले धान्य बाहेर विकू नये. शासनाकडून मिळालेले धान्य कोण विक्री करत असेल तर १८००२२४९५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
- संगीता खोमणे, परिमंडळ ‘क’ अधिकारी

मनसेतर्फे तक्रार
कोथरूड भागात रेशन दुकानदार रेशनकार्ड धारकांना शासकीय नियमाप्रमाणे धान्य देत नसल्याची तक्रार मनसेच्या वतीने संजय काळे, गणेश शिंदे, सचिन विप्र, बाळा शिंदे यांनी अन्नधान्य पुरवठा विभागाच्या उपजिल्हाधिकारी सुरेखा माने, तहसीलदार अपर्णा तांबोळी यांच्याकडे नुकतीच केली आहे.

जप्त करण्यात आलेले धान्य
आठ पोती तांदूळ, एक पोते गहू, जवळपास पंधरा ते वीस किलो शालेय पोषण आहारातील हरभरा