दर महिन्याला गरजूंना किराणा साहित्याचे वाटप रिझर्व्ह बँकेच्या सेवानिवृत्त अधिकारी सुहासिनी बिवलकर यांचा उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दर महिन्याला गरजूंना किराणा साहित्याचे वाटप
रिझर्व्ह बँकेच्या सेवानिवृत्त अधिकारी सुहासिनी बिवलकर यांचा उपक्रम
दर महिन्याला गरजूंना किराणा साहित्याचे वाटप रिझर्व्ह बँकेच्या सेवानिवृत्त अधिकारी सुहासिनी बिवलकर यांचा उपक्रम

दर महिन्याला गरजूंना किराणा साहित्याचे वाटप रिझर्व्ह बँकेच्या सेवानिवृत्त अधिकारी सुहासिनी बिवलकर यांचा उपक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : वयाची ७५ वर्षे पूर्ण होण्याआधी ७५ गरजूंना प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपयांच्या किराणा साहित्याचे मोफत वाटप करण्याचा संकल्प रिझर्व्ह बँकेच्या सेवानिवृत्त अधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्त्या सुहासिनी बिवलकर यांनी वयाच्या ७० वर्षी केला. फेब्रुवारी २०२२ मध्ये पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्यानंतरदेखील साहित्य वाटपाचा उपक्रम अविरतपणे सुरू आहे.

मुंबई येथे रिझर्व्ह बँकेत २५ वर्षे नोकरी केल्यानंतर पुण्यातील सिंहगड रस्ता येथे स्थायिक झालेल्या बिवलकर या निवृत्तीनंतरदेखील लोकसेवा करत आहेत. घरकाम करणाऱ्या महिला, ज्या मुलांचे पालक हयात नाहीत मात्र आजी-आजोबा सांभाळ करतात अशा गरजू नागरिकांना गरजेनुसार हजार, दोन हजार रुपयांचे किराणा साहित्य या प्रमाणे प्रत्येक महिना पाच हजार रुपयांचे साहित्य वाटप करण्यात येते. या उपक्रमाच्या माध्यमातून पाच वर्षांत तीनशेहून जास्त कुटुंबांना मदत पोच करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विविध सामाजिक संस्था, पंतप्रधान, मुख्यमंत्री सहायता निधी, वैद्यकीय, शैक्षणिक मदत त्यांनी केली आहे. २०११ मध्ये पतीचे निधन झाल्यानंतर सगळे दुःख विसरून बिवलकर यांनी पतीचे नेत्रदानदेखील केले. विद्यार्थी सहायक समितीसारख्या शैक्षणिक संस्थेशी गेली काही वर्षे त्या जोडल्या गेल्या आहेत.

आपण कल्पनाही करू शकणार नाही इतकी आपण केलेली मदत इतरांच्या आयुष्यात खूप मोलाची ठरेल. दानशूरांनी गरजूंना सढळ हाताने शैक्षणिक, वैद्यकीय मदत करायला हवी.
- सुहासिनी बिवलकर, सेवानिवृत्त अधिकारी, रिझर्व्ह बँक