अब्दुल सत्तार यांच्याविरोधात आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अब्दुल सत्तार यांच्याविरोधात आंदोलन
अब्दुल सत्तार यांच्याविरोधात आंदोलन

अब्दुल सत्तार यांच्याविरोधात आंदोलन

sakal_logo
By

शिवाजीनगर, ता. ८ : खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरत टीका केली. त्यामुळे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राणी लक्ष्मीबाई पुतळा, जंगली महाराज रस्ता येथे जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
खासदार सुळे यांची कृषिमंत्र्यांनी व्यक्तिगत माफी मागावी व महिलांबाबत अपमानकारक विधान करणाऱ्या मंत्र्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षामध्ये राजकीय संस्कृतीचा एक धागा अनेक वर्षे जपण्यात आलेला आहे. यामध्ये विरोधी व सत्ताधारी पक्षाने अनेक वर्षे राजकारणापलीकडे जाऊन सौहार्दाचे वातावरण जपले आहे. अशामध्ये सत्तार यांनी सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अशोभनीय व असंस्कृत आहे.’’
याप्रसंगी आमदार सुनील टिंगरे, अंकुश काकडे, प्रदीप देशमुख, प्रदीप गायकवाड, विशाल तांबे, वैशाली नागवडे, मृणालिनी वाणी, किशोर कांबळे, विक्रम जाधव, अप्पा शिंदे, रूपाली पाटील यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.