रोटरी क्लबतर्फे दंत तपासणी शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोटरी क्लबतर्फे दंत तपासणी शिबिर
रोटरी क्लबतर्फे दंत तपासणी शिबिर

रोटरी क्लबतर्फे दंत तपासणी शिबिर

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : रोटरी क्लब ऑफ डेक्कन जिमखानातर्फे मोफत दंत तपासणी शिबिर शुक्रवारी (ता. ११) नोव्हेंबरला झाले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शनिवारपेठेतील पूर्व प्राथमिक विभाग शाळेतील विद्यार्थ्यांकरिता प्राचार्या शिल्पा कुलकर्णी, शिक्षिका स्वाती मर्चंट यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिराचा एकूण २५० विद्यार्थी, शिक्षकांनी लाभ घेतला. दंत तपासणी करून डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून रोटरी क्लब तर्फे प्रत्येकी एक टूथ ब्रश आणि टूथ पेस्ट दिली. रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ अमित आंद्रे, सचिव डॉ. उमेश फालक, केतकी फालक, जयश्री दापोडीकर दंतचिकित्सा डॉ. सारिका भळगट-रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्रुती पतंगे यांनी शिबिर घेतले.