साड्या, पैसे देण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र चोरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साड्या, पैसे देण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र चोरले
साड्या, पैसे देण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र चोरले

साड्या, पैसे देण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र चोरले

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : वारजे येथील ज्येष्ठ महिला भाजी आणण्यासाठी जात असताना. रस्त्यावर अनोळखी दोन इसमांनी त्यांना अडवून सांगितले की, आमच्या साहेबांना खूप वर्षांनंतर मुलगा झाला आहे. साहेब साड्या व पैसे देतात. हे सांगून ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र पिशवीत ठेवायला सांगितले. दोन इसमांनी ज्येष्ठ महिलेचा विश्वास संपादन करून मंगळसूत्र घेऊन तेथून पसार झाले, अशी फिर्याद दोन अज्ञाताविरोधात एका ज्येष्ठ महिलेने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात दिली. ही घटना शनिवार (ता.१२) रोजी सकाळी पावणेबाराच्या सुमारास घडली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गिरी सावंत हे करीत आहेत.