वारजेतील रविंद्र ढोलेसह साथीदारावर ‘मोक्का’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारजेतील रविंद्र ढोलेसह साथीदारावर ‘मोक्का’
वारजेतील रविंद्र ढोलेसह साथीदारावर ‘मोक्का’

वारजेतील रविंद्र ढोलेसह साथीदारावर ‘मोक्का’

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : वारजे पोलिस स्टेशन परिसरात खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, चोरी, मालमत्तेचे नुकसान करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीर शास्त्र बाळगणे, सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेला टोळी प्रमुख रविंद्र ढोले (वय ३०, रा. साई जीम, कर्वेनगर) व त्याचा एक साथीदार प्रतीक दुसाने (वय २९, आनंदनगर, सिंहगड रस्ता) यांच्याविरुद्ध ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्यासाठी वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दगडु हके यांनी पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा यांच्यामार्फत पश्चिम प्रादेशिक विभाग, अपर पोलिस आयुक्त यांना अहवाल सादर केला होता. यास मान्यता मिळाल्यानंतर ही कारवाई केली गेली. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त रूक्मिणी गलंडे या करत आहेत.