क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम
क्राईम

क्राईम

sakal_logo
By

टिंगलटवाळी करणाऱ्यांना हाकलून दिल्याने मारहाण
पुणे, ता. २० : श्री संत तुकाराम विद्यालय लोहगाव येथे मुलीला घेण्यासाठी उमेश खांदवे (वय ४०) थांबले असता तेथे जवळपास टिंगलटवाळी करत असलेल्या मुलांना त्यांनी हाकलून दिले. त्याचा राग धरत त्या मुलांनी, खांदवे यांना लोखंडी कोयता, रॉडने मारहाण केली. या वेळी जमलेल्या लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला असता सोडणार नाही, असे बोलून दहशत निर्माण केली. मारहाण केल्याबद्दल उमेश खांदवे यांनी पाच अनोळखी इसमांविरोधात विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक निरी लहाने करत आहेत.
-------------------------
कोरेगाव पार्क येथे हॉटेलवर कारवाई
पुणे, ता. २० : कोरेगाव पार्क येथे एका हॉटेलमध्ये रात्री १० नंतर मोठ्या आवाजात गाणी लावण्यात आल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडे मिळाली असता, त्या ठिकाणी जाऊन एक लाख ८४ हजार रुपये किमतीचे संगीत साहित्य जप्त करण्यात आले. कोरा कॉकटेल बार अॕण्ड किचन या हॉटेलवर कारवाई करण्यात आली. यापुढे अशा कारवाया करण्यात येणार असून ध्वनी प्रदूषण व पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार जप्त केलेले साहित्य कोरेगाव पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
-----------------------------
सहा रिक्षा चोरणाऱ्यांना युनिट तीन कडून अटक
पुणे, ता. २० : पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते व सतीश काळे यांना मिळालेल्या माहितीवरून औंध रस्त्यावर, सेंट थॉमस चर्च येथे सापळा रचून शादाब अन्सारी (वय २१), सय्यद नगर हडपसर, अखिल चौधरी (वय ३८) यांना चोरीच्या रिक्षासह ताब्यात घेऊन अटक केली. खडकी न्यायालयात त्यांची तपासणी करण्यासाठी कस्टडी घेऊन, रिमांड मुदतीत तपास केला असता त्यांनी एकूण सहा रिक्षा चोरल्याचे निष्पन्न झाले. खडकी, दत्तवाडी,भारती विद्यापीठ, कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये रिक्षा चोरी झाल्याची फिर्याद असून त्या सहा रिक्षा या दोघांनी चोरल्याचे तपासात समोर आले.