प्रश्न विचारणे हे पुणेकरांचे वैशिष्ट्य डॉ. कलमाडी हायस्कूलमध्ये सुधा मूर्ती यांचा विद्यार्थ्यांशी संवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रश्न विचारणे हे पुणेकरांचे वैशिष्ट्य 
डॉ. कलमाडी हायस्कूलमध्ये सुधा मूर्ती यांचा विद्यार्थ्यांशी संवाद
प्रश्न विचारणे हे पुणेकरांचे वैशिष्ट्य डॉ. कलमाडी हायस्कूलमध्ये सुधा मूर्ती यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

प्रश्न विचारणे हे पुणेकरांचे वैशिष्ट्य डॉ. कलमाडी हायस्कूलमध्ये सुधा मूर्ती यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

sakal_logo
By

पुणे, ता. १ : ‘‘मी बेंगळुरूमध्ये राहत असले, तरी मनाने मात्र पुण्यातच असते. पुणे शहरातील आठवणी कायम सोबत असतात,’’ शहरातील अनुभवलेले प्रसंग सांगत पद्मश्री सुधा मूर्ती यांनी आपल्या पुण्यातील आठवणींना उजाळा दिला.

कावेरी ग्रुप आॕप इन्स्टिट्यूटच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त इन्फोसिसच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांचा ‘विद्यार्थ्यांशी संवाद’ हा कार्यक्रम एरंडवणे येथील डॉ. कलमाडी श्यामराव हायस्कूलच्या सभागृहात गुरुवारी (ता. १) आयोजित केला होता. या वेळी त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होत्या. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारले. या वेळी पुणेकर शांत बसत नाहीत, प्रश्न विचारतात हे पुणेकरांचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले.

मूर्ती म्हणाल्या, ‘‘मुलांनी मोबाईलमधील गेमपेक्षा मैदानी खेळ खेळावे. आपले पालक, शिक्षक आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगत असतात. मला शालेय वयात हे कधीच समजले नाही. परंतु आयुष्याच्या टप्प्यावर ते फायद्याचे ठरते. जरी तुम्हाला ते समजत नसले, तरी त्यानुसार कृती करा. त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. शाळेत येताना विद्यार्थी उसाप्रमाणे असतात. शाळेचे शिक्षक त्यांचे रूपांतर साखरेत करतात. शिक्षक नसतील तर विद्यार्थी नसेल. विद्यार्थ्यांसारखेच शिक्षकसुद्धा दरवर्षी प्रगतीचे नवे टप्पे गाठत असतात. तुमची मातृभाषा ही संस्कृतीशी जोडलेली असल्याने ती विसरू नका. जर तुम्ही भाषा विसरलात, तर तुम्ही संस्कृती विसराल. भाषा माणसांशी जोडणारा पूल आहे.’’

या प्रसंगी संस्थेतील प्राध्यापक कामिनी सक्सेना, प्रा. लक्ष्मी गांधी, प्रा. अशोक अग्रवाल, प्रा. चंद्रकांत हरकुडे, डॉ. माधुरी चित्तेवार, डॉ. कांचन देशपांडे, रेश्मा देशपांडे यांना मूर्ती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी संस्थेचे पदाधिकारी खुशाल हेगडे, मालती कलमाडी, राधिका शर्मा, आल्बा, डॉ. नारायण हेगडे, इंदिरा सालियान, सुधाकर राव, देविका शेट्टी आदी उपस्थित होते. प्रा. पल्लवी नाईक, शिल्पा खेर, ज्योती कडकोल यांनी केले होते.