Tue, March 28, 2023

मोहन आगाशे यांना
‘गदिमा पुरस्कार’
मोहन आगाशे यांना ‘गदिमा पुरस्कार’
Published on : 2 December 2022, 12:01 pm
पुणे, ता. २ : गदिमा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी साहित्य, चित्रपट, कला क्षेत्रात दिला जाणारा ‘गदिमा पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना जाहीर झाला आहे. तसेच ‘गृहिणी सखी सचिव’ पुरस्कार साधना बहुलकर, चैत्रबन पुरस्कार दिग्दर्शक प्रवीण तरडे, विद्या प्रज्ञा पुरस्कार योगिता गोडबोले यांना जाहीर झाल्याचे शुक्रवारी पत्रकार परिषदेत आनंद माडगूळकर, प्रकाश भोंडे, राम कोल्हटकर यांनी सांगितले. ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. १४) सायंकाळी पाच वाजता कोथरूड येथील यशवंतराव नाट्यगृहात गदिमा स्मृती समारोह होणार आहे. यावेळी ‘गदिमांच्या पंचवटीतून’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून, गदिमांचे लहान भाऊ डॉ. अंबादास माडगूळकर यांच्या स्मरणार्थ ‘गदिमा आणि लता’ हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम निःशुल्क असणार आहे.