दृष्टिहीन कल्याण संघाचा सोमवारी उपोषणाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दृष्टिहीन कल्याण संघाचा
सोमवारी उपोषणाचा इशारा
दृष्टिहीन कल्याण संघाचा सोमवारी उपोषणाचा इशारा

दृष्टिहीन कल्याण संघाचा सोमवारी उपोषणाचा इशारा

sakal_logo
By

पुणे, ता. २ : दृष्टिहीन कल्याण संघाच्या वतीने विविध मागण्यांचे पत्र अपंग व कल्याण आयुक्तांनी देण्यात आले होते. मात्र त्याची दखल न घेतल्याने सोमवारी (ता. ५) आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेत संतोष राऊत, युवराज दळवी, जालिंदर मंगळवेढेकर, मंगल कोळीगिरी यांनी दिला.
ज्या विशेष मुलांना वसतीगृहामध्ये प्रवेश मिळत नाही त्यांना स्वाधार योजना लागू करावी, तीन एप्रिलच्या सरकारी निर्णयात बदल करावा, पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण कसे मिळेल याचा विचार व्हावा, शासकीय सेवेतील दिव्यांगांच्या सर्व जागा तत्काळ भराव्यात, सर्व विभागात दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी नेमावे, स्थानिक स्वराज्य संस्थेमधील पाच टक्के राखीव निधी खर्च करण्यास लेखी आदेश द्यावेत, सार्वजनिक व्यवस्था सक्षम करावी, एसटी महामंडळात राखीव सीट सक्तीने देण्यात यावे असा आदेश द्यावा, घरकुल योजनेत पाच टक्के आरक्षण, निवासी अंधशाळेच्या अनुदानात वाढ, निवासी व अन्य शाळेतील रिक्त जागा भराव्यात. दिव्यांग अपंग कल्याण आयुक्त बालाजी मंजुळे यांची नियुक्ती करण्यात यावी, आदी दृष्टिहीन कल्याण संघाच्या मागण्या आहेत.