आचार्य गोविंद गिरी जी महाराज यांचे विचार आचरणात आणावे: माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आचार्य गोविंद गिरी जी महाराज यांचे विचार आचरणात आणावे: माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत
आचार्य गोविंद गिरी जी महाराज यांचे विचार आचरणात आणावे: माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत

आचार्य गोविंद गिरी जी महाराज यांचे विचार आचरणात आणावे: माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत

sakal_logo
By

साधू-संतांच्या विचारांनी देश बदलेल

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे मत; गुरुमहात्म्य पुरस्कारांचे वितरण

पुणे, ता. ३ ः ‘‘आज समाजात वृद्धाश्रम वाढत चालले आहेत. वृद्धाश्रम स्थापन करणे, ही आपली परंपरा नाही, तरी देखील ती संख्या वाढत आहे. साधू-संतांचे विचार अनेकजण ऐकायला जातात. पण, नंतर ते विचार विसरले जातात. ते विचार आचरणात आणले तर देश बदलायला वेळ लागणार नाही’’, असे मत गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी व्यक्त केले.
कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त १२५ वा दत्त जयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये गुरुमहात्म्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. याप्रसंगी आमदार माधुरी मिसाळ, माजी आमदार उल्हास पवार, आशा कामत, ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागीरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड. रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनील रुकारी, डॉ. पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते.
धार्मिक कार्यासाठी स्वामी गोविंददेव गिरी महाराज, सामाजिक क्षेत्रासाठी बीव्हीजी ग्रुपचे प्रमुख हणमंतराव गायकवाड व वैद्यकीय क्षेत्रासाठी सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ. सायरस पूनावाला यांना गुरुमहात्म्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. तत्पूर्वी, पहिल्या दिवशी श्री दत्त भक्ती कथेला प्रारंभ झाला. यावेळी श्री गुरुदत्त दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांचा श्री दत्त भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. डॉ. पराग काळकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक अॕड. प्रताप परदेशी यांनी केले. सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. अॕड. शिवराज कदम यांनी आभार मानले.

लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट, श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग यांच्या सहयोगाने श्री दत्त भक्ती कथा हा कार्यक्रम दररोज दुपारी ४ ते ६ या वेळेत होणार आहे. सप्तस्वरोत्सवात दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होतील. सर्व कार्यक्रमांना विनामूल्य प्रवेश आहे. पुणेकरांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे केले आहे.