राजकीय हस्तक्षेपात कुलगुरूंनी आत्मसन्मान सांभाळावा : डॉ. सावंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजकीय हस्तक्षेपात कुलगुरूंनी आत्मसन्मान सांभाळावा : डॉ. सावंत
राजकीय हस्तक्षेपात कुलगुरूंनी आत्मसन्मान सांभाळावा : डॉ. सावंत

राजकीय हस्तक्षेपात कुलगुरूंनी आत्मसन्मान सांभाळावा : डॉ. सावंत

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : दिवसेंदिवस विद्यापीठांमधील राजकीय हस्तक्षेप वाढतो आहे. अशा काळात कुलगुरूंनी आपला आत्मसन्मान सांभाळून शैक्षणिक मिशन पूर्ण करावे. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी तेच केले आहे. त्यांचे आत्मकथन ही कोंडीत सापडलेल्या कुलगुरूंची प्रातिनिधिक कैफियत आहे, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. विवेक सावंत यांनी व्यक्त केले.
डॉ. साळुंखे यांच्या ‘विद्येच्या प्रांगणात’ या पुस्तकाचे प्रकाशन ‘नॅक’चे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांच्या हस्ते झाले. या वेळी वेळी ते बोलत होते. समारंभाचे अध्यक्षस्थान खासदार श्रीनिवास पाटील यांनी भूषविले. याप्रसंगी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, डॉ. रणधीर शिंदे, मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर उपस्थित होते. डॉ. बी. पी. बंडगर यांनी मनोगत व्यक्त केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन यांनी केले.
डॉ. साळुंखे म्हणाले, ‘‘या जीवनकहाणीतून मी माझ्या शिक्षण, संशोधन, प्रशासन व विविध संस्थांच्या माध्यमातून केलेले कार्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विज्ञान आणि मानवता हातात हात गुंफून चिरंतन विकासासाठी प्रयत्नशील व्हावी, ही दृष्टी माझ्या मनात बिंबली. त्याचाच कमी-अधिक आविष्कार माझ्या वर्तनातून झाला.’’