Wed, June 7, 2023

आरटीई प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी
आरटीई प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी
Published on : 15 March 2023, 2:13 am
पुणे, ता. १५ : आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख वाढवून मिळण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेच्या वतीने करण्यात आली.
काही एजंट या योजनेच्या नियमावलीत पात्र नसलेल्या पालकांकडून पैसे मागून प्रवेश प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आमिष दाखवत आहेत. तरी प्रवेश प्रकिया नियमानुसार करावी, अशी मागणी करणारे निवेदन अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे आणि प्राथमिक शिक्षण अधीक्षक गणेश खाडे यांना देण्यात आले. कोणत्याही गरजू विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही, असे आश्वासन प्रशासनाने द्यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे गुरनानी यांनी केली. कार्याध्यक्ष मोहित बराटे उपस्थित होते.