‘२३ गावांच्या विकासासाठी महापालिकेकडे नियोजन द्यावे’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘२३ गावांच्या विकासासाठी 
महापालिकेकडे नियोजन द्यावे’
‘२३ गावांच्या विकासासाठी महापालिकेकडे नियोजन द्यावे’

‘२३ गावांच्या विकासासाठी महापालिकेकडे नियोजन द्यावे’

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : महापालिका हद्दीतील २३ गावांना सोयीसुविधा पुरविणाऱ्या पुणे महापालिकेलाच स्पेशल प्लॅनिंग ॲथॉरिटी नियुक्त करून नियोजनाचे अधिकार द्यावेत, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत गुरुवारी केली. महापालिकेतील २३ गावांच्या समावेशाबाबत लक्षवेधी सूचना आमदार सुनील टिंगरे यांनी मांडली. या सूचनेवरील चर्चेत आमदार शिरोळे यांनी भाग घेतला. पुणे महापालिकेच्या हद्दीत २३ गावांचा समावेश जेव्हा करण्यात आला त्यावेळी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पीएमआरडीएला स्पेशल प्लॅनिंग ॲथॉरिटी म्हणून नियुक्त केले होते. परंतु या २३ गावांमध्ये सर्व सोयीसुविधा पुणे महापालिका पुरविते आणि महसूल मात्र पीएमआरडीए वसूल करते. याकरिता पीएमआरडीए ऐवजी सोयीसुविधांची कामे करणाऱ्या पुणे महापालिकेलाच नियोजनाचे अधिकार देऊन स्पेशल प्लॅनिंग ॲथॉरिटी म्हणून नियुक्त करावे, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे केली.