अवतीभवती

अवतीभवती

स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा पुण्यात कार्यक्रम
पुणे, ता. २६ : शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज प्रथमच पुण्यात येत आहेत. सनातन धर्माच्या स्थापनेसाठी शंकराचार्य महाराज सातत्याने धर्मप्रचार यात्रा काढत आहेत. ते शुक्रवारी (ता. २८) दुपारी दोन वाजता विमानाने पुणे विमानतळावर पोचतील. सुरुवातीला पादुकापूजन प्रतीकनगर, पौड रस्ता, कोथरूड येथे होणार आहे. तीन वाजता दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन पूजा करून मुकुंदनगर येथे दुपारी साडेचार वाजता ते जाणार आहेत. तिथे स्वागत, पादुकापूजन व रात्रीचा विसावा असेल. शनिवारी (ता. २९) सकाळी साडेनऊ वाजता आनंद भुतडा यांच्या सोमवार पेठेतील निवासस्थानी पादुकापूजन व आशीर्वाद भेट होईल. दुपारी साडेतीन वाजता कांची शंकर मठ, सारसबाग येथून आशीर्वाद भेट सुरू होऊन मित्रमंडळ चौकमार्गे मुकुंदनगर येथे ती समाप्त होईल. रविवारी (ता. ३०) सकाळी साडेनऊ ते साडेबारा या वेळेत आईमाता मंदिराजवळ गुरू देवींचा कार्यक्रम होईल. दुपारी साडेतीन वाजता वर्धमान सांस्कृतिक भवन, कात्रज-कोंढवा रस्ता येथे गुरुवात्सल्य कार्यक्रम होईल. सोमवारी (ता. १) मे रोजी सकाळी साडेसहा वाजता वर्धमान सांस्कृतिक भवन येथे दीक्षा समारंभ होणार आहे.

‘बिल्डर असोसिएशन’च्या अध्यक्षपदी चौधरी
पुणे, ता. २६ : १९४१ मध्ये काही ठेकेदारांनी मिळून तत्कालीन मुख्य अभियंता सदर्न कमांड ब्रिगेडियर सी. व्ही. जॅक्सन यांच्या मार्गदर्शनाखाली बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाची स्थापना पुणे येथे केली होती. या संस्थेच्या २०२३-२४ वर्षासाठी पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली असून, अध्यक्षपदी डी. एस. चौधरी, उपाध्यक्ष सुनील मते, सचिव अजय गुजर, खजिनदार राजाराम हजारे या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आल्या आहे.

अनाथ मुलांना कपडे व धान्यवाटप
पुणे, ता. २६ : अक्षय्य तृतीयेच्या मुहर्तावर दादा साळोखे यांच्या वतीने जनसेवा फाउंडेशनच्या अनाथ मुलांना कपडे व धान्याचे वाटप करण्यात आले. साळोखे नेहमी सामाजिक उपक्रम राबवितात. या वेळी त्यांच्यासमवेत कार्यकर्ते अभिजित ननावरे, किरण मोरे, प्रथमेश जगताप, बिलाल पानसरे, अमित साळोखे आदी उपस्थित होते.

शहर युवक काँग्रेसतर्फे स्नेहमेळावा
पुणे, ता. २६ : पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने सर्वधर्मसमभाव स्नेहमेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंडित गाडगीळ, मौलाना काजमी, आमदार रवींद्र धंगेकर, प्रशांत जगताप, संजय मोरे, राहुल शिरसाठ, रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, वनराज आंदेकर, विशाल धनवडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अक्षय खांगटे-पाटील, डॉ. विक्रम गायकवाड, अशफाक शेख यांनी केले. या वेळी गाडगीळ व काजमी यांनी मनोगत व्यक्त करताना, एकात्मता व शांततेचा संदेश दिला. आमदार धंगेकर यांनी असे कार्यक्रम ठिकठिकाणी घेण्यात यावेत, असे आव्हान केले. सागर पकाले यांनी सूत्रसंचालन केले, अक्षय पाटील यांनी प्रास्ताविक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com