
क्षेत्रीय कार्यालयांत महिन्यातून दोनदा बैठका घेऊ : शिरोळे
पुणे, ता. ११ : नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील क्षेत्रीय कार्यालयांमध्ये महिन्यातून दोनदा बैठका घेण्याचा संकल्प आमदार शिरोळे यांनी गुरुवारी जाहीर केला. औंध आणि घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात क्षेत्रीय अधिकारी तसेच औंध, बोपोडी, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, मॉडेल कॉलनी इत्यादी भागांतील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत सविस्तर बैठका घेण्यात आल्या. या वेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यावेळी त्यांनी हा संकल्प जाहीर केला. बैठकीस प्रकाश ढोरे, मधुकर मुसळे, बाळासाहेब रानवडे, दत्तात्रेय गायकवाड, सचिन वाडेकर, दत्ता खाडे, रवींद्र साळेगावकर, सुनील पांडे, घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी रवी खंदारे आदी उपस्थित होते.