‘पुणे आयडॉल’ स्पर्धेची अंतिम फेरी उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पुणे आयडॉल’ स्पर्धेची अंतिम फेरी उत्साहात
‘पुणे आयडॉल’ स्पर्धेची अंतिम फेरी उत्साहात

‘पुणे आयडॉल’ स्पर्धेची अंतिम फेरी उत्साहात

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : सोमेश्वर फाउंडेशनतर्फे आयोजित ‘पुणे आयडॉल’ स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी (ता.१४) बालगंधर्व रंगमंदिर येथे उत्साहात पार पडली. स्पर्धेचे हे २०वे वर्ष होते. सहा दिवस चाललेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील ८१६ कलाकारांनी सहभाग घेतला होता.
कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने दिवंगत माजी आमदार विनायक निम्हण यांनी स्पर्धेची सुरुवात केली होती. एकूण चार विभागात झालेल्या स्पर्धेत ‘लिटिल चॅम्प’ : प्रथम श्रेया गाढवे, द्वितीय तनय नाझीरकर. ‘ओल्ड इज गोल्ड’ : प्रथम अब्दुल रजाक बेगमपल्ली, द्वितीय शशिकला वाखारे. ‘जनरल कॅटेगरी’ प्रथम पल्लवी पाठक, द्वितीय डॉ. तेजस गोखले. ‘युवा आयडॉल’ : प्रथम समृद्धी पटेकर, द्वितीय संदीप दुबे. हे ‘पुणे आयडॉल २०२३’चे विजेते ठरले.
विजेत्यांना पंधरा हजार रुपये रोख रक्कम , सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तर उत्तेजनार्थ श्लोक जावीर, प्राजक्ता माने यांना प्रत्येकी पाच हजार रुपये रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. रविवारी (ता. १४) झालेल्या अंतिम स्पर्धेत संगीत, सूर, टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोष पाहायला मिळाला. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, गायक अभिजित कोसंबी, जितेंद्र भुरूक, स्वाती निम्हण, बाळासाहेब बोडके, मुकारी अलगुडे, अमित गावडे, ज्ञानेश्वर मुरकुटे, गणेश घुले, नितीन दांगट, सुनील काशीद आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक आयोजक सनी निम्हण यांनी केले. मिलिंद कुलकर्णी व प्रवीण पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. उमेश वाघ, अमित मुरकुटे यांनी स्वागत केले. तर, बिपिन मोदी यांनी आभार मानले. वनमाला कांबळे, किरण पाटील, रमेश भंडारी, तुषार भिसे अभिषेक परदेशी, कासिम तुर्क, नीतेश दास, संजय माझिरे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.